चिपळूण ः सावरकर स्मृतिदिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः सावरकर स्मृतिदिन साजरा
चिपळूण ः सावरकर स्मृतिदिन साजरा

चिपळूण ः सावरकर स्मृतिदिन साजरा

sakal_logo
By

बालकुमारांच्या उपस्थितीत
स्वा. सावरकर स्मृतिदिन
चिपळूण, ता. २ ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्यावतीने बालकुमारांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रूजावेत या हेतूने झालेल्या मासिक मेळाव्याचे दुसरे सत्र नुकतेच स्वा. विनायक दामोदर सावरकर स्मृतिदिन आणि मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडले. वाचनालयाच्या कलादालनात पार पडलेल्या या मेळाव्यात स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली. मेघ देवळेकर व ओजस कुंटे यांनी ''जयोस्तु ते'' चे गायन केले. कल्याणी मंदार ओक हिने भाषण केले. मेघना चितळे यांनी ''बाल बलिदानी'' या शीर्षकांतर्गत 1942च्या आंदोलनात निर्भयपणे तिरंगा फडकावून प्राणार्पण करणाऱ्या आसामच्या कनकलतेची कथा परिणामकारक शब्दात सांगितली. सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीची, नवशब्द निर्मितीची माहिती देण्यात आली. कोमसापच्या अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे यांनी सावरकरांच्या ऊर्जस्वल कवितांची विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली. या कवितांच्या आधाराने मुलांशी प्रश्नोत्तररूप संवाद करण्यात आला. मराठी राजभाषा दिन निमित्ताने ‘मातृभाषा मराठी’ विषयीचे चिंतन करण्यात आले. मराठीची तोडफोड न करता जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोलण्याचे व लिहिण्याचे आवाहन यावेळी डॉ. देशपांडे यांनी केले.