
दाभोळ ःदापोलीत श्री सदस्यांकडून स्वच्छता
दापोलीत श्री सदस्यांकडून स्वच्छता
दाभोळ ः दापोली शहरात महास्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पडले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान हा उपक्रम वर्षभर राबवला जात आहे. त्यातूनच या महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. दापोलीतील प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय येथील परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच बुरोंडीनाका ते काळकाईकोंड हा मुख्य रस्ता दुतर्फा स्वच्छ करण्यात आला. स्वच्छतेतून सुका व ओला कचरा स्वतंत्र करून तो वाहनांनी दापोली नगरपंचायतीच्या कचरा प्रकल्पामध्ये टाकण्यात आला. यासाठी श्रीसदस्यांनी विशेष वाहनांची व्यवस्था केली होती. दापोलीतील विविध ठिकाणी हे अभियान एकाचवेळी सुरू व्हावे यासाठी श्री सदस्यांनी पूर्वनियोजन केले होते. दापोलीतील श्री सदस्यांच्या या विशेष योगदानाबद्दल दापोलीकरांनी विशेषतः कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.