सावर्डे-निवळीच्या बिटकॉन संघाने पटकावला निकम चषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावर्डे-निवळीच्या बिटकॉन संघाने पटकावला निकम चषक
सावर्डे-निवळीच्या बिटकॉन संघाने पटकावला निकम चषक

सावर्डे-निवळीच्या बिटकॉन संघाने पटकावला निकम चषक

sakal_logo
By

दोन्ही फोटो आवश्‍यक
फोटो ओळी
-rat२p३२.jpg ः KOP२३L८६४३० सावर्डे ः क्रिकेट स्पर्धेतील विजेता निवळीचा बिटकॉन संघ.
-rat२p३३.jpg ःKOP२३L८६४३१ उपविजेता सचिन इलेव्हन संघ.
------------------

निवळीच्या बिटकॉन संघाने
पटकावला शेखर निकम चषक
सावर्डे, ता. २ ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील यंग बॉईज क्रिकेट क्लब आयोजित सह्याद्री क्रीडा संकुलामध्ये झालेल्या आमदार शेखर निकम चषकावर निवळीच्या बिटकॉन संघाने सचिनभाऊ इलेव्हन संघास पराभूत करून आमदार निकम चषकावर नाव कोरले. त्यामुळे सावर्डे सचिनभाऊ इलेव्हनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला.
विजेत्या संघाला दोन लाखाचा धनादेश व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघास एक लाखाचा धनादेश व आकर्षक चषक यंगबॉईज अध्यक्ष केतन पवार, उद्योजक सचिन पाकळे, मुन्ना देसाई, रवींद्र ब्रीद, प्रशांत निकम, संजय पाकळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. मॅन ऑफ दी मॅच व मॅन ऑफ दी सीरिज बिटकॉनच्या सागर कांबळेला दुचाकी व रोख रक्कम देण्यात आली. सागरने पूर्ण सीरिजमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत संघास यशस्वी केले. स्पर्धेत प्रत्येक पराभूत संघास आकर्षक चषक, रोख रक्कम तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर, षटकारचा राजा, उत्कृष्ट गोलंदाज यांना रोख रक्कम, आकर्षक चषक व सन्मानचिन्ह देण्यात आले.
यंग बॉईज संघाकडून गत ३३ वर्षे ही स्पर्धा भरवली जात होती. आमदार निकम यांचा रात्री १० वा. यंग बॉईज संघाकडून व्यासपीठावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी चिपळूण पंचायत समिती माजी सभापती पूजा निकम, प्रकाश राजेशिर्के, सुजाता राजेशिर्के, जमीर मुल्लाजी, संतोष चव्हाण, रफिक चिलवाण, साजन कुरूसिंगल, राजेश सुर्वे, रफिक चिलवान, अभिषेक सुर्वे, अशोक काजरोळकर, नायशी उपसरपंच संदीप घाग, सावर्डे पंचक्रोशीतील सर्व क्रीडारसिक उपस्थित होते.