राजापूर ः धारतळे-गावखडी रस्त्यासाठी कॉंग्रेसची बांधकामवर धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः धारतळे-गावखडी रस्त्यासाठी कॉंग्रेसची बांधकामवर धडक
राजापूर ः धारतळे-गावखडी रस्त्यासाठी कॉंग्रेसची बांधकामवर धडक

राजापूर ः धारतळे-गावखडी रस्त्यासाठी कॉंग्रेसची बांधकामवर धडक

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२p३४.jpg ःKOP२३L८६४३७ राजापूर ः बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कांबळे यांच्याशी चर्चा करताना माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे आणि सहकारी.


धारतळे-गावखडी रस्त्यासाठी
कॉंग्रेसची ‘बांधकाम’वर धडक

निधी मंजूर असूनही काम नाही ; १५ मार्चची डेडलाईन, रास्ता रोकोचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः राजापूर आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या धारतळे-गावखडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असूनही वर्षभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही डांबरीकरणाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे संतप्त काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष, तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, मच्छीमार नेते अमजद बोरकर आणि सहकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोकांच्या उद्रेकाची वाट पाहिली जात आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कांबळे यांच्याशी रस्ताकामाच्या प्रत्यक्ष आरंभाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी बांधकाम विभागाकडून १५ मार्चपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरवात होणार असल्याचे आश्‍वासन दिले. मात्र जर १५ मार्चपर्यंत कामाला सुरवात न झाल्यास १६ मार्चला पूर्वकल्पना न देता रास्ता रोका केला जाईल, असा इशारा अ‍ॅड. खलिफे आणि सहकाऱ्यांनी दिला. या वेळी बोरकर, बाकाळकर, मलीक गडकरी, नाना कुवेस्कर यांच्यासह आदी उपस्थित होते.
निधी येऊनही अद्यापही कामाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेले माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाकाळकर, मच्छीमार नेते बोरकर आदींनी आज बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कांबळे यांनी रस्त्यावरील मोर्‍यांची कामे झाली असून लवकरच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले.


१५ किमीच्या रस्त्याची दूरवस्था
रत्नागिरीकडे जाण्यासाठी तालुक्यातील वाहनचालकांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनचालकांकडून धारतळे-गावखडी रस्त्याचा सर्रासपणे उपयोग केला जात आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सातत्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्त्याची पार दुरवस्था झालेली असून रस्त्यातील खड्डे चुकवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. सुमारे १५ कि. मी. च्या या रस्त्याचे डांबरीकरण आणि मोऱ्यांच्या कामासाठी शासनाकडून निधी देण्यात आला आहे. या कामाची निविदा मंजूर होऊन बांधकाम विभागाकडून वर्कऑर्डर देऊन सुमारे वर्षभराचा कालावधी उलटला आहे.