
मुख्य कार्यकारी अधिकारी बनले निक्षयमित्र
rat०२४७.TXT
बातमी क्र.. ४७ (पान ३ साठी)
मुख्य कार्यकारी अधिकारी बनले निक्षयमित्र
रत्नागिरी, ता. ३ ः राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत क्षय रुग्णांना दरमहा ५०० रुपये रुग्णांच्या खात्यावर जमा केले जातात; परंतु ही मदत अत्यंत अल्प असून या खेरीज अन्नपुरवठा व इतर सुविधांसह कार्य देणे आवश्यक आहे. जेणेकरून रुग्णांची प्रकृती तप्तरतेने पूर्ववत होण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावरून निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय टीबी फोरम सभेत जिल्हाधिकारी यांनीदेखील सर्व खासगी औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना जास्तीत जास्त निक्षय मित्र होण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी प्रत्येकी एक रुग्ण दत्तक घेऊन त्या रुग्णांना पोषण आहार देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, क्षयरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.