त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करा
त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करा

त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करा

sakal_logo
By

rat०२५१.txt

बातमी क्र..५१ (पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat२p४२.jpg ः
८६४६५
राजापूर ः वनपाल सदानंद घाटगे यांना निवेदन देताना ग्रामस्थ.
--

त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करा

नागरिकांनाच्यात भितीचे वातावरण ; वनविभागाला निवेदन

राजापूर, ता. २ ः राजापूरच्या नायब तहसीलदार दीपाली पंडित यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. शिमगोत्सवाला सुरवात झाली असून या मार्गावर दिवस-रात्र लोकांची वर्दळ राहणार आहे. त्या वेळी बिबट्याच्या हल्ल्याची जास्त भिती आहे. त्यामुळे या बिबट्याला पिंजऱ्‍यात जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांच्या शिष्टमंडळाने वनविभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वनपाल सदानंद घाटगे यांना आज नागरिकांनी हे निवेदन दिले. या निवेदनावर डॉ. सुयोग परांजपे, रमेश गुणे, रवींद्र रानडे, प्रभाकर नवरे, श्रुती ताम्हणकर, गायत्री हर्डीकर, सुयोगा जठार, शिल्पा मराठे, गोविंद चव्हाण, रसिका बोरवणकर, मंदार दीक्षित, चारूदत्त नाखरे, शीतल पटेल यांच्यासह भटाळी परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्‍या आहेत. भटाळीकडून कोर्टाकडे जाणारा रस्ता व पुढील बाजूला स्मशानभूमीकडून गुरववाडीकडे जाणारा रस्ता या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी गुरववाडीत जाणाऱ्‍या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रात्री नायब तहसीलदार पंडित यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. सातत्याने घटणाऱ्‍या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
--