सिंधुदुर्गात माकडताप अखेर डोकावला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात माकडताप अखेर डोकावला
सिंधुदुर्गात माकडताप अखेर डोकावला

सिंधुदुर्गात माकडताप अखेर डोकावला

sakal_logo
By

सिंधुदुर्गात माकडताप अखेर डोकावला
दोन रुग्ण ः आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २ ः जिल्ह्यात काजू, आंबा पिकाचा हंगाम सुरू झाल्याने या कालावधीत उद्भवणाऱ्या माकडतापावर नियंत्रण मिळवण्यासाठी हिवताप विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात गोचीड सर्व्हेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. जानेवारीपासून तपासण्यात आलेल्या १०४ रक्त नमुन्यांमध्ये २ माकडतापाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी दिली.
जिल्ह्यात दरवर्षी काजू, आंबा पिकाच्या हंगामात माकड तापाचे रुग्ण आढळून येतात. त्यानुसार हिवताप विभागामार्फत सुरुवातीपासूनच याबाबत दक्षता घेण्यात येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासह औषध फवारणी, आणि आवश्यक उपाययोजनेचे नियोजन करण्यात आले आहे. माकडतापावर नियंत्रण मिळविण्यात गेल्या दोन वर्षापासून हिवताप विभागाला यश मिळाले आहे. वेळीच रुग्णांचा शोध आणि उपाययोजना करण्यासाठी हिवताप विभागाचे कर्मचारी सतर्क ठेवण्यात आले आहेत.
--------------
चौकट
गोचीड सर्व्हेक्षण मोहीम
जिल्ह्यात माकडतापावर नियंत्रण मिळविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांमध्ये गोचीड सर्व्हेक्षण मोहीम राबविण्यात आली. त्यात दोडामार्ग, बांदा, पणदूर , डीगस, गोळवण, फणसगाव, तुळस या भागातील आठ ठिकाणी गोचीड कलेक्शन करून तपासण्यात आल्या. त्यामध्ये डीगस येथे माकडताप दूषित गोचिड आढळून आली आहे. त्यामुळे या भागात तातडीने औषध फवारणीसह आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
-------------
चौकट
आजार*पाठवलेले रक्त नमुने*दूषित नमुने
माकडताप*१०४*२
डेंगू*१८१*१९
चिकुनगुण्या*१८१*६
मलेरिया*२४,८१२*२
(जानेवारी २०२३ पासून आजपर्यतचा अहवाल)
---------------
कोट
सिंधुदुर्गात माकडतापाचे रुग्ण वाढण्याच्या शक्यतेने सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. आवश्यक औषधसाठा तसेच यंत्रसामुग्री उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात माकडताप नियंत्रणात आहे. कोठेही उद्रेक नाही. मात्र, या साथीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपायोजना व आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे."
- डॉ. रमेश कर्तसकर, हिवताप अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद,