
कुडाळात ‘महाविकास’तर्फे जल्लोष
86473
कुडाळ ः पुण्यातील विजयानंतर महाविकास आघाडीतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
कुडाळात ‘महाविकास’तर्फे जल्लोष
कुडाळ ः प्रतिष्ठेच्या बनलेल्या पुणे-कसबा येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. धंगेकर यांच्या विजयामुळे कसबा येथे मागील २८ वर्षांतील भाजपची सत्ता गेली. या विजयानंतर महाविकास आघाडीतर्फे येथील गांधी चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना तालुकाध्यक्ष राजन नाईक, कुडाळच्या नगराध्यक्षा आफ्रिन करोल, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अमरसेन सावंत, अतुल बंगे, राजू गवंडे, किरण शिंदे, कृष्णा तेली, संतोष शिरसाट, संदीप महाडेश्वर, ज्योती जळवी, उदय मांजरेकर, गुरुनाथ गडकर, भास्कर परब, अक्षता खटावकर, विद्याप्रसाद बांदेकर आदी उपस्थित होते.