-दापोलीत पाच संशयितांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-दापोलीत पाच संशयितांवर गुन्हा दाखल
-दापोलीत पाच संशयितांवर गुन्हा दाखल

-दापोलीत पाच संशयितांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

rat०२३९.txt

बातमी क्र. ३९ (पान ३ साठी)

खोटे मालक उभे करून खरेदीखत

दापोलीत पाच संशयितांवर गुन्हा दाखल

दाभोळ, ता. २ ः दापोली तालुक्यातील खेर्डी येथील जमिनीचे खोटे मालक उभे करून खरेदीखत करून जमीन नावावर केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन जाधव (बौद्धवाडी, खेर्डी) यांचे वडील केशव जाधव तसेच सहहिस्सेदार बबन जाधव, गौतमी येलवे, गंगाराम जाधव, बाळा जाधव या ५ जणांच्या नावे खेर्डी येथे सुमारे ९६ गुंठे जमीन होती. ७ जुलै २०११ ला या मिळकतीचे खरेदीखत नोंदवून ही मिळकत विलास गजेंद्रराव घावट (५०, टांगर गल्ली दापोली) यांच्या नावे करण्यात आली आहे. या खरेदी खताच्याआधारे महसूल दफ्तरी मालक म्हणून विलास घावट यांची नोंद करण्यात आली. ही माहिती नितीन जाधव यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये समजल्यानंतर त्यांनी खरेदी खताची नक्कल घेतली.
या खरेदीखताचा त्यांनी अभ्यास केला असता मूळ मालक बबन जाधव यांच्याऐवजी संदेश रूके (४०, म्हाळुंगे) याने सही केली. गौतमी येलवे यांच्याऐवजी कमला जाधव यांना उभे करण्यात आले होते. केशव जाधव यांच्याऐवजी नवनीत जाधव (४२) यांना उभे करून हे खोटे खरेदीखत नोंदवण्यात आले आहे. या खरेदीखतावर ओळख म्हणून इम्तियाझ इस्माईल रखांगे व महादेव लक्ष्मण खेडेकर यांनी सह्या केल्या होत्या. या सर्वांनी संगनमत करून फसवणूक केल्याप्रकरणी संबधित ५ संशयितांविरोधात नितीन केशव जाधव यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण करत आहेत.
---