बावशीवासीयांचे उपोषण स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावशीवासीयांचे उपोषण स्थगित
बावशीवासीयांचे उपोषण स्थगित

बावशीवासीयांचे उपोषण स्थगित

sakal_logo
By

swt231.jpg
86495
बावशीः आमदार नीतेश राणे यांचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देताना रविराज मोरजकर. सोबत मनाली गुरव, अजय कांडर आदी.

बावशीवासीयांचे उपोषण स्थगित
आमदार राणेंकडून दखल ः दहा दिवसांत रस्तादुरुस्तीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २ः बावशी (ता.कणकवली) रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, यासाठी गावातील महिलांनी आज सकाळी उपोषण केले. या आंदोलनाची तातडीने दखल घेत आमदार नीतेश राणे यांनी पुढील दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. दहा दिवसांत रस्ताकामाला प्रारंभ न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा बावशी गावच्या महिलांनी दिला.
येथील ग्राम संघातर्फे तोंडवली-बावशी फाटा येथे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनश्री कांडर, तिरंगा ग्रामसंघ अध्यक्ष सुप्रिया खडपे, सचिव दिया राणे, कार्याध्यक्ष रुपाली मर्ये, सीआरपी संगीता कदम, माजी अध्यक्षा विनिता कांडर, रेणुका राणे, रुपाली मर्ये, संगीता कदम, वनिता कांडर, रेणुका राणे, रितेष कांडर, राजेश कांडर, ओंकार कांडर, भाई मर्ये, दक्षरथ मर्ये, प्रमोद मर्ये, संजय राणे, संदीप कांडर, आनंद नार्वेकर, सुभाष नार्वेकर, विजय सावंत, अक्षय कदम, स्वप्नील खडपे तसेच तिरंगा ग्रामसंघ बावशीच्या सर्व महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान महिलांनी काही काळ बावशी एसटी रोखून धरली. या आंदोलनाची माहिती अर्थसंकल्प अधिवेशनासाठी मुंबई येथे असलेल्या आमदार राणे यांना देण्यात आली. त्यांनी फोनवरून आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून रस्ता दुरुस्त करण्याची ग्वाही दिली; मात्र आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासनाची मागणी केली. त्यानंतर आमदार राणेंनी आपल्या सहीचे पुढील दहा दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचे पत्र दिले. या लेखी आश्वासनानंतर उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी तिरंगा ग्राम संघाच्या अध्यक्षा खडपे याना नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी लेखी पत्र दिले. यावेळी तोंडवली-बावशी सरपंच मनाली गुरव, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, कणकवली बांधकाम विभागाच्या सौ. जाधव, श्री. महाले, विलास कांडर, हेमंत कांडर, पत्रकार व कवी अजय कांडर, पोलिस पाटील समीर मयेकर आदी उपस्थित होते.