डीएड अभियोग्यता चाचणी परीक्षा तात्काळ रद्दबाबत निवेदन सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीएड अभियोग्यता चाचणी परीक्षा तात्काळ रद्दबाबत निवेदन सादर
डीएड अभियोग्यता चाचणी परीक्षा तात्काळ रद्दबाबत निवेदन सादर

डीएड अभियोग्यता चाचणी परीक्षा तात्काळ रद्दबाबत निवेदन सादर

sakal_logo
By

swt236.jpg
86504
दोडामार्गः शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना निवेदन देताना डीएड बेरोजगार संघर्ष समिती पदाधिकारी.


डीएड अभियोग्यता चाचणी परीक्षा
तात्काळ रद्दबाबत निवेदन सादर
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २ः डीएडधारकांसाठीची अभियोग्यता चाचणी परीक्षा तात्काळ रद्द करावी, प्रत्येक जिल्हास्तरावर स्थानिकांमधून डीएड पदविका मेरीटचा विचार करून सरसकट पदभरती करावी, बरीच वर्ष प्रतीक्षेत असलेल्या स्थानिकांना न्याय द्यावा, यांसह विविध मागण्या असलेले निवेदन डीएड बेरोजगार संघर्ष समितीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांना आज येथे दिले. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार विनायक राऊत यांचे याबाबत लक्ष वेधू, वेळ पडल्यास यासाठी आझाद मैदानात उतरू आणि न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन यावेळी श्री. धुरी यांनी दिले.
तालुक्यातील गणेश मंदीरात आज डीएड बेरोजगार संघर्ष समितीची सभा झाली. या सभेत डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे संघटना अध्यक्ष विजय फाले, कुणाल कदम, रोहन देसाई, प्रमोद डीचोलकर, राजेश वाघाटे, हरिश्चंद्र शेटवे, रामदास नाईक, पल्लवी गवस, रुबी राणे, भाग्यश्री राणे, स्वराली गवस, शुभ्रा देसाई, दीक्षा देसाई, शांती गवस तसेच शिवसेना कार्यकर्ते संदेश वरकसह महिला उपजिल्हाध्यक्ष विनिता घाडी, कोनाळ विभागप्रमुख संतोष मोरये उपस्थित होते.