अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्यास रोणापालवासीयांचा मदतीचा हात

अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्यास रोणापालवासीयांचा मदतीचा हात

swt235.jpg
86503
बांदाः गोठस्कर कुटुंबीयांकडे आर्थिक मदत देताना प्रकाश गावडे व रोणापाल ग्रामस्थ.

अपघातग्रस्त शालेय विद्यार्थ्यास
रोणापालवासीयांचा मदतीचा हात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २ः येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला रोणापाल येथील सूरज गोठस्कर या शालेय विद्यार्थ्याला रोणापालवासीयांनी आर्थिक मदतीचा हात दिला. सूरजच्या घरची आर्थिक स्थिती बेताची असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रोणापाल ग्रामस्थांनी तरुण वर्गाने पुढाकार घेत उपचारासाठी आर्थिक मदत दिली. रोणापाल ग्रामस्थांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सूरज गोठस्कर या शालेय विद्यार्थ्याचा आठ दिवसांपूर्वी बांदा येथे दुचाकी अपघात झाला. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते; मात्र गोठस्कर कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने ग्रामस्थांनी हॉस्पिटलचा अर्धा खर्च करण्याचा निर्धार केला. माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्यासोबत ग्रामस्थांनी सावंतवाडी येथे हॉस्पिटलमध्ये सूरजची भेट घेत आश्वासनाप्रमाणे गावडे आणि अन्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही मदत सुपूर्द करण्यात आली. यासाठी परशुराम गावडे, सुदिन गावडे, राजन परब, नंदकिशोर नेमन, किरण नाईक, एकनाथ भोगटे, सीताराम गावडे, मंगेश गावडे, नरेंद्र कानडे, बाबल तुयेकर, अंकुशकाका, दीपक परब, नारायण नाईक, तानाजी धरणे, वामन गावडे, नाना कुडव, प्रशांत गावडे, नवलू कोळापटे, नीलेश नाईक, संतोष कोळापटे, सुशांत गावडे, विष्णू तोरस्कर, राजाराम भोगटे, सचिन कुबल यांनी सहकार्य केले. गोठस्कर कुटुंबीयांकडून आभार मानण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com