नेरुर-वाघचौडीत
शूटिंगबॉल स्पर्धा

नेरुर-वाघचौडीत शूटिंगबॉल स्पर्धा

नेरुर-वाघचौडीत
शूटिंग बॉल स्पर्धा
ओरोस ः नेरूर-वाघचौडी (ता.कुडाळ) येथील ओमकार मित्रमंडळ वाघचौडी यांच्यावतीने जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे १८ ला सायंकाळी ५.३० वाजता एमआयडीसी येथील विराज प्लास्टिक कंपनी जवळील वाघचौडी शूटिंग बॉल स्पर्धा मैदान येथे आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम ७००१ रुपये, द्वितीय ५००१, तृतीय २००१ व चतुर्थ १००१ रुपये बक्षीस ठेवण्यात आले असून चारही विजेत्या संघांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट शूटर, उत्कृष्ट लिफ्टर, उत्कृष्ट नेटमन यांच्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी योगेश गावडे, सुमन गावडे, अमेय परब येथे संपर्क करण्याचे आवाहन आयोजक यांच्यावतीने केले आहे. सायंकाळी साडेपाच पर्यंत उपस्थित न राहणाऱ्या संघाना प्रवास भत्ता दिला जाणार नाही. सायंकाळी सहानंतर उपस्थित राहणाऱ्या संघाना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही, असे आयोजक मंडळाने कळविले आहे.
------
कणकवली येथे
आरोग्य शिबिर
कणकवली ः येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलतर्फे १२ मार्चला स्टोन क्लिनिक या शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला निःशुल्क देण्यात येणार आहे. यात पित्ताशयातील खडे यामध्ये वारंवार पोटात दुखणे, अ‍ॅसिडिटीचा त्रास, वरच्यावर छातीत भरणे, सततची पोटात मळमळ, किडणी स्टोन यात सतत लघवीचा त्रास, पूर्वीचे स्टोनचे ऑपरेशन, कुशीत दुखणे, प्रोस्टेटचा त्रास तसेच स्वादुपिंडातील खडे यामध्ये सोनोग्राफीमध्ये स्वादुपिंडातील खडे, स्वादुपिंडाचा पूर्वीचा त्रास, स्वादुपिंडाचे पूर्वीचे खड्यांचे ऑपरेशन व स्वादुपिंडाची सूज याबाबत तपासणी करण्यात येणार आहे. यात किडणी स्टोन व प्रोस्टेटचे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. ओजीडी स्कोपी, सोनोग्राफी व दुर्बिणीने तपासणी माफक दरात करण्यात येणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी डॉ. नागवेकर हॉस्पिटल, पहिला मजला, विद्यामंदिर हायस्कूलसमोर, कणकवली येथे संपर्क साधावा.
-------------
कणकवलीत
रक्तदान शिबिर
कणकवली ः शहरातील उद्योजक उत्तम धुमाळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १० मार्चला विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत गणपती सान्यालगत असलेल्या श्री देवी चौंडेश्वरी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन मेहुल धुमाळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com