
सदगुरू भक्त सेवा न्यासतर्फे कुडाळातील क्षयरुग्ण दत्तक
86613
माडयाचीवाडी ः येथे कुडाळ तालुक्यातील क्षयरुग्णांना जीवनावश्यक वस्तू प्रदान करताना गावडे काका महाराज. शेजारी इतर.
सदगुरू भक्त सेवा न्यासतर्फे
कुडाळातील क्षयरुग्ण दत्तक
कुडाळ, ता. ३ ः राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमा अंतर्गत निक्शय मित्र या योजनेअंतर्गत माडयाचीवाडी स्वामी समर्थ मठ येथे प. पू. श्री. गावडे काका महाराज संस्थापित श्री सदगुरू भक्त सेवा न्यास (रजि.) यांसकडून तालुक्यातील ५ क्षयरुग्णांना दत्तक घेवून त्यांना सहा महिन्याकरिता अन्नधान्यसाठा पूरक आहार पुरविला.
गावडे काका महाराज यांच्या ३१ मार्चला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आणखी २६ क्षयरुग्ण म्हणजे एकुण ३१ क्षयरुग्ण सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊ, असा संकल्प गावडे काका महाराज यांनी केला आहे. या स्तुत्य कार्यक्रमात श्री सदगुरू भक्त सेवा ज्ञास अध्यक्ष एकनाथ गावडे, पंकज कामत, सौ. प्रिती कुशे तसेच इतर पदाधिकारी, जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे कर्मचारी जे. ए. गोसावी (आरोग्य पर्यवेक्षक), लक्ष्मण कदम (वरीष्ठ उपचार पर्यवेक्षक), सुरेश मोरजकर (जिल्हा पिपीएम समन्वयक) उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील गरजु क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार दिल्याबद्दल गावडे काका महाराज व श्री सदगुरू भक्त सेवा ज्ञास संस्थेचे जिल्हा क्षयरोग कार्यालयामार्फत आभार मानले.