
दिविजा वृद्धाश्रमाचा वर्धापन दिन उत्साहात
86614
असलदे ः येथील दिविजा वृद्धाश्रमाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित ग्रामस्थ.
दिविजा वृद्धाश्रमाचा
वर्धापन दिन उत्साहात
तळेरे, ता. ३ ः असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आजी आजोबांचे मनोरंजन व्हावे, यासाठी गीत, कथाकथन, विनोद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी स्वस्तिक फाउंडेशन संस्थेचे विश्वस्त उपस्थित होते. या आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षपदी मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख कार्यकारी अभियंता संजय सावंत, कॅन केअर ( कॅन्सर) रिसर्च सेंटरचे अध्यक्ष सागिर देशमुख आदी उपस्थित होते. वृद्धांची वाढती मागणी त्यामुळे आश्रम विस्तार यांची प्रमुख आवश्यकता आहे. २०२५ पर्यंत ५० स्त्रिया व ५० पुरुष वृध्द उपेक्षित निराधार, गरीब व गरजू, अपंग, सर्व सुखसोई युक्त आश्रम उभारणी करण्यासाठी नवीन इमारतींच्या चलचीत्रांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अविनाश फाटक, संदेश शेट्ये व श्रीमती दिपीका रांबाडे यांनी आधुनिक आश्रमाची विस्तारित संकल्पना मांडली. या वर्धापन दिनाला मुंबईचा गीत, कथाकथन व गाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निवेदन शरद कुवसेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मैथीली फाटक आणि विजय जाधव यांनी करुन दिला. यावेळी रवींद्र सावंत, संदीप खोचरे, श्रीमती. फाटक, योजना परब, वर्षा पाशेतकर, श्रीमती तिलोत्तमा लोखंडे यांनी गाणी व कथा कथन सादर केले.