कोल्हा, उदमांजर, मुंगुसाची शिकार पडणार महागात

कोल्हा, उदमांजर, मुंगुसाची शिकार पडणार महागात

rat३p१७.jpg-
86625
कोल्हा
-rat३p१८.jpg-
86626
मुंगुस
-rat३p१९.jpg-
86627
उदमांजर
-rat३p२०.jpg-
86628
तरस
-rat३p२१.jpg-
86629
साळिंदर
------------
कोल्हा, उदमांजर, मुंगुसाची शिकार पडणार महागात
वन्यजीव कायद्यात सुधारणा संरक्षण ; शिकार, तस्करीला बसणार चाप
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः वन्यप्राण्यांची वाढती शिकार, तस्करी रोखण्यासाठी तसेच नामशेष होऊ लागलेल्या वन्यप्राणी, पक्षी, सर्प प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धनसाठी केंद्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. थेट भारतीय वन्यजीव कायद्यात दुरुस्ती करून काही सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांमुळे वन्यजीव संरक्षण अनुसुची ४ मध्ये असलेले काही प्राणी, पक्षी यांना आता थेट अनुसुची १ मध्ये स्थान दिले आहे. यामध्ये कोल्हा, उदमांजर, मुंगुस, तरस अन् साळिंदरसारख्या वन्यप्राण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या वन्यप्राण्यांची शिकार केल्यास संबंधितांना कठोर शिक्षा भोगावी लागणार आहे.
केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यातील दुरुस्ती विधेयक ८ डिसेंबर २०१२ संसदेत सादर केले. त्यास संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली. वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर रोख बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणीप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. शिक्षेच्या तरतुदींमध्येही बदल करत वन्यजीव कायद्यातील शिक्षेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. दंडाच्या रकमेतही वाढ करून २५ हजारांच्या दंडाची शिक्षा आता थेट लाखावर जाऊन पोहोचली आहे. वन्यजीव कायद्यातील या सुधारांमुळे यापूर्वी शेड्युल २ किंवा ४ मध्ये असलेल्या वन्यजीवांना थेट शेड्युल १ मध्ये स्थान दिले आहे. यामुळे या वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची स्थिती भविष्यात अधिक उंचावण्यास मदत होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना प्राप्त झाली असून, त्याबाबत अंमलबजवाणी केली जाणार आहे. वनविभागाच्या चिपळूण येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
----------------------
चौकट-१
साळिंदर थेट अव्वलस्थानी
साळिंदर (सायाळ) हा वन्यप्राणी अनुसूची ४ मध्ये होता; मात्र आता त्याचा समावेश अनुसूची-१मध्ये करण्यात आला आहे. रानपिंगळा घुबडानंतर श्रुंगी घुबडालाही अनुसूची-१मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मुंगुसाच्या सर्व प्रजातींनाही अनुसूची-१मध्ये अव्वलस्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मुंगुसाची शिकार केल्यास त्यास कैद केल्यास कारावासासह मोठा दंडदेखील भरावा लागू शकतो.

चौकट-२
राज्यप्राणी शेकरूसुद्धा अनुसूची १ मध्ये
राज्यप्राणी शेकरू यापूर्वी अनुसूची-१ मध्ये होता; मात्र, सुधारणेनंतर त्यास आता अनुसूची-१मध्ये स्थान दिले आहे. यामुळे शेकरूच्या संवर्धनासाठी मदत होणार आहे. नाशिकमध्ये शेकरूला पेट शॉपमध्ये विक्रीस ठेवल्याचे मागील वर्षी उघडकीस आले. या प्राण्यांचा संरक्षण दर्जा आता वाढवल्यामुळे वाघ, बिबट्याप्रमाणे त्यालाही स्थान दिले गेले.

चौकट
पक्षी अनुसूची-१मध्ये
श्रुंगी घुबड, बहिरी ससाणा (फाल्कन), शिक्रा, राखी धनेश, निळा माशीमार (ब्लू फ्लायकॅचर, काळ्या मानेचा करकोचा, कॉमन क्रेन, डोमिसल क्रेन, सायबेरियन क्रेन, सारस क्रेन, कॉमन पोचार्ड (लहान लालसरी), दुर्मिळ युरेशियन स्पूनबिल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com