गगनबावडा घाट रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरूस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावडा घाट रस्ता 
पावसाळ्यापूर्वी दुरूस्त
गगनबावडा घाट रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरूस्त

गगनबावडा घाट रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरूस्त

sakal_logo
By

86634
करुळ : येथील गगनबावडा घाटरस्ता ठिकठिकाणी खड्डेमय झाला आहे.

गगनबावडा घाट रस्ता
पावसाळ्यापूर्वी दुरूस्त

आमदार नाईक; अधिवेशनातही दखल


कणकवली, ता.३ : वैभववाडी मार्गे कोल्‍हापूरला जाणारा गगनबावडा घाट रस्त्याची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. तशी ग्‍वाही विधीमंडळ अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली असल्‍याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
श्री.नाईक म्‍हणाले, गगनबावडा घाटमार्गाची मोठी दूरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्‍याने वाहन चालविणे मुश्‍कील झाले आहे. या रस्ता दुरूस्तीसाठी निधी मंजूर झाल्‍याचे सांगितले जात आहे; मात्र अद्यापही घाट रस्ता दुरूस्तीच्या कामाला प्रारंभ झालेला नाही. याबाबत विधीमंडळात प्रश्‍न उपस्थित केला होता. यात गगनबावडा घाटरस्ता दुरूस्तीचे काम नेमके कधी सुरू होईल आणि केव्हा पूर्ण होईल याबाबतची विचारणा करण्यात आली होती. गगनबावडा घाटमार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. यात गगनबावडा घाट रस्ता दुरूस्तीबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण होईल अशी ग्‍वाही विधीमंडळात दिली आहे.