जिद्दीच्या जोरावर सुमेधा 
बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये

जिद्दीच्या जोरावर सुमेधा बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये

86641
सुमेधा तोंडवळकर

जिद्दीच्या जोरावर सुमेधा
बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये

सिंधुदुर्ग महाविद्यालयाची विद्यार्थिनी

मालवण, ता. ३ : येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाची एनसीसी कॅडेट आर्ट्स विभागातून शिक्षण घेतलेली सुमेधा तोंडवळकर हिची बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (सीमा सुरक्षा दल) निवड झाली.
सुमेधा ही अत्यंत प्रामाणिक होतकरू व कष्टाळू मुलगी आहे. जिद्द, चिकाटी, मेहनत या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत तसेच कृ. सी. देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वालावलकर, संस्थेचे सेक्रेटरी चंद्रशेखर कुशे आदींनी सुमेधाचे अभिनंदन व कौतुक केले. जे विद्यार्थी कॉलेज करत असताना एनसीसीमध्ये प्रवेश घेतात, त्यांना सिक्युरिटी गार्ड, पोलिस भरती, आर्मी भरतीमध्ये सवलत दिली जाते. वेगवेगळ्या कंपन्या, पॅरामिलिटरी, स्पर्धा परीक्षा यामध्ये एनसीसी सी सर्टिफिकेट होल्डर्स विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. आर्मी भरतीमध्ये एनसीसी कॅडेट्स ''सी '' सर्टिफिकेट होल्डर असेल तर त्याला लेखी परीक्षा नसते फक्त फिजिकल फिटनेस पाहिला जातो. त्यामुळे कॉलेज करत असताना एनसीसी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा होतो. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचा आलेख नेहमी चढताच राहील. जास्तीत जास्त एनसीसी कॅडेट्स पोलीस भरती, आर्मी भरती, तटरक्षक दल, अग्नीवीर, सिक्युरिटी गार्ड, महाराष्ट्र कॅडेट फोर्स यामध्ये भरती करण्याचे उद्दिष्ट आहे, असे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत व प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com