किशोर चव्हाण यांचा सत्कार

किशोर चव्हाण यांचा सत्कार

86653
मसुरे ः प्राचार्य किशोर चव्हाण यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करताना संस्थाध्यक्ष डॉ. दीपक परब. बाजूला महेश बागवे, सरोज परब, वर्षा चव्हाण आदी.

किशोर चव्हाण यांचा सत्कार
मसुरे : येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालयाचे प्राचार्य किशोर चव्हाण यांचा बागवे हायस्कूल सभागृहात मसुरे एज्यूकेशन सोसायटीतर्फे निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. बागवे हायस्कूल व एम. जी बागवे तांत्रिक विद्यालय व भरतगड हायस्कूल शिक्षकांच्यावतीने, संस्था अध्यक्ष डॉ. दिपक परब यांनी सुद्धा भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला. मान्यवरांनी चव्हाण यांच्या बाबत गौरवोद्गार काढले. यावेळी लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब, सुभाष बागवे, राजन परब, विठ्ठल लाकम, शेखर बागवे, डॉ सुधीर मेहेंदळे, मिलिंद प्रभू, नंदू मुळीक, बाबुराव प्रभुगावकर, राधिका परब, रमेश पाताडे, वर्षा चव्हाण, पंढरीनाथ मसुरकर, बबन कांबळी, प्रसाद बागवे, अनिल मेस्त्री, भानुदास परब, डी. पी. पेडणेकर, भरत ठाकूर, एस. डी. बांदेकर, ए. यु. कोदे आदी उपस्थित होते.
---------
इन्सुलीत आज धार्मिक कार्यक्रम
बांदा ः श्री देव राष्ट्रोळी मंदिर इन्सुली कुडवटेंब येथे उद्या (ता.४) धार्मिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यानिमित्ताने सायंकाळी चारला भजनाचा कार्यक्रम व रात्री नऊला श्री वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा स्त्री वेषधारी गणेश हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन राष्ट्रोळी मित्रमंडळ इन्सुली कुडवटेंब व ग्रामस्थांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com