संत गोरा कुंभार पतसंस्थेच्या चार शाखांना मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत गोरा कुंभार पतसंस्थेच्या चार शाखांना मान्यता
संत गोरा कुंभार पतसंस्थेच्या चार शाखांना मान्यता

संत गोरा कुंभार पतसंस्थेच्या चार शाखांना मान्यता

sakal_logo
By

rat०३२६.txt

बातमी क्र..२६ (पान २ साठी)

फोटो ओळी
- ratchl३२.jpg ः
८६५९९
उमरोली ः संत गोरा कुंभार नागरी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन करताना महेश सायकर, प्रकाश साळवी.
--
संत गोरा कुंभार पतसंस्थेच्या चार शाखांना मान्यता

मुख्यालय खेर्डीत ः सुलभ पद्धतीने कर्जपुरवठा करणार

चिपळूण, ता. ३ ः येथील संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेने शाखा विस्तारास सुरूवात केली आहे. संस्थेच्या एकूण चार नवीन शाखा सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळालेली आहे. संस्थेचे मुख्यालय खेर्डी येथे असून, तालुक्यातील दुसरी शाखा उमरोली (घोणसरे) येथे सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन प्रदेश सामाजिक संस्था कार्याध्यक्ष महेश सायकर आदींच्या उपस्थितीत झाले.
गेल्या अनेक वर्षापासून खेर्डी येथे संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतंसस्था कार्यरत आहे. संस्थेने सुरवातीपासूनच अवास्तव खर्च टाळून पारदर्शक कारभार ठेवला आहे. गतवर्षीच संस्थेला चार शाखा सुरू करण्याची मान्यता मिळाली होती. त्यानुसार शाखा उमरोली येथे सुरू करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष व पतसंस्था चेअरमन सुभाष गुडेकर यांनी संस्थेची वाटचाल स्पष्ट केली. संत गोरा कुंभार विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी उमरोली सरपंच रूपाली मोहिते, उपसरपंच दिनेश गांधी, व्हा. चेअरमन सुनील टेरवकर, सुनील साळवी, प्रकाश महाराज निवळकर, रवी साळवी, संतोष भडवळकर, दादा खेडेकर यांच्यासह विकास मंडळाचे पदाधिकारी, पतसंस्थेचे संचालक आदी उपस्थित होते.