जनआक्रोश समितीचे 20 मार्चला आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनआक्रोश समितीचे 20 मार्चला आंदोलन
जनआक्रोश समितीचे 20 मार्चला आंदोलन

जनआक्रोश समितीचे 20 मार्चला आंदोलन

sakal_logo
By

जनआक्रोश समितीचे २० मार्चला आंदोलन
४५ हजार चाकरमान्यांनी सह्या ;महामार्गाची दूरवस्था
चिपळूण, ता. ३ः मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जनआक्रोश समितीने पुढाकार घेतला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २० मार्चला मुंबईतील आझाद मैदान येथे जनआक्रोश आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतील ४५ हजाराहून अधिक चाकरमान्यांनी सह्यांच्या माध्यमातून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती अॅड. ओवेस पेचकर यांनी दिली.
मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने मुंबईत प्रत्येक गावातील मंडळ, संघटना यांची भेट घेऊन हे जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी विनंती व आवाहन करण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पेचकर यांनी सांगितले. ते म्हणाले, जनआक्रोश आंदोलन आता गावागावात आणि वाडीवाडीत वणव्यासारखा पेट घेत आहे. मुंबईत राहणारे चाकरमानी सणाच्या निमित्ताने महामार्गाने कोकणात येतात. महामार्गाची इतकी वर्ष दुरवस्था झाली आहे की, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. हे आम्ही लोकांना पटवून सांगत आहोत. सरकार कोणाचेही असो, आपण रस्त्यावर उतरून सरकारला जाग आणू आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घेऊ. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे. कोकणात अनेक मंडळ, संघटना व विविध घटकांवर काम करणाऱ्या विविध समित्या आहेत. सर्वांचा उद्देश एकच आहे; पण या सर्वांनी एक कोकणकर म्हणून एकदा या झोपेचे सोंग घेऊन बसलेल्या शासन-प्रशासनाला खडखडून जागे करूया, असे आवाहन त्यांनी केले.

कोट
कोकणाला नेहमीच सावत्रपणाची वागणूक आपल्याच नेत्यांकडून देण्यात येत आहे; पण कोकणकरांनो आपण सावत्र नाहीत तर एका आईची म्हणजेच कोकणचे भूमिपुत्र आहोत आणि एकीचे बळ काय असतं हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. त्यासाठीच हा जनतेचा लढा आहे.
- ॲड. ओवेस पेचकर, चिपळूण