क्राईम एकत्रित

क्राईम एकत्रित

rat०३३६.txt

बातमी क्र.३६ (पान ३ साठी)

वेरवलीतील भाजलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी ः वेरवली (ता. लांजा) येथील प्रौढ भाजून जखमी झाला होता. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. रमेश आत्माराम साळसकर (वय ५८, रा. वेरवली, ता. लांजा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) दुपारी घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साळसकर यांनी २७ फेब्रुवारीला कोणत्यातरी अज्ञात कारणाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामध्ये ९० टक्के भाजून जखमी झाले. नातेवाइकांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत याबाबत नोंद करण्यात आली आहे.
-----
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जखमी

रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा रस्त्यावर अज्ञात वाहनाने पादचारी तरुणाला धडक दिली. जोरदार धडक बसल्याने तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. प्रशांत गंगाराम होरंबे (वय ३५, रा. पानवल, रत्नागिरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री प्रशांत होरंबे हे रस्त्याने चालत आपल्या घरी जात होते. त्याचवेळी अज्ञात मोटारीने प्रवीणला जोरदार धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने प्रवीण यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. अज्ञात वाहनाने प्रवीणला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढलेला असून, ग्रामीण पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
-----

लग्न ठरत नसल्याने तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी ः कुंभारखाणी खुर्द (ता. संगमेश्वर) येथील तरुणाने झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रवीण रघुनाथ भोजने (वय ३२, रा. कुंभारखाणी खुर्द भोजनेवाडी, संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २) दुपारी कुंभारखाणी खुर्द महाडिकवाडी दंड (खोडा) या ठिकाणी निदर्शनास आली. पोलिस ठाण्यात खबर देणाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण हे आजारी असल्याने तसेच त्याचे लग्न ठरत नव्हते. त्यांनी झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतला. त्यांना माखजन येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी त्यांचा भाऊ अजित भोजने याने संगमेश्वर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com