शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख
अनिल परुळेकर यांचे निधन
शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे निधन

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर यांचे निधन

sakal_logo
By

86708
अनिल परुळेकर

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख
अनिल परुळेकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. ३ ः शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अनिल हरी परुळेकर (वय ८५) यांचे काल (ता.२) रात्री साडेआठ वाजता निधन झाले. परुळेकर क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जात.
मेकॅनिकल अॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेले परुळेकर हे कोईमतूरमध्ये नोकरीला होते.१९८५ ला ते शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ते कार्यरत होते. कोकणात शिवसेना रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या माठेवाडा येथील निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे वास्तव्यास होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत मराठी माणसांच्या हक्कासाठी लढत राहिले. भारतीय कामगार सेना लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत होते. १९८३ ते २००० पर्यंत मुंबई येथे नोकरी केली. २००८ पर्यंत सल्लागार इंजिनियर म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते सावंतवाडीतील मूळ घरी वास्तव्यास आले. आध्यात्माचे ते गाढे अभ्यासक होते. साहित्याचीही त्यांना रूची होती. त्यांच्या एका पुस्तकाच नुकतेच प्रकाशन पार पडले होते. दुसऱ्या पुस्तकाचे ते लवकरच प्रकाशन करणार होते. कडवट अन् स्पष्टवक्ते असणारे परूळेकर शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. शेवटच्या क्षणापर्यंत ते सामाजिक कार्यात सहभागी झाले होते. निवृत्त शिक्षिका पद्मा फातर्पेकर यांचे ते भाऊ तर डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे ते चुलते होते. सामाजिक कार्यकर्त्या गौरी परब, मालवण येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हरिष परुळेकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात मुलगी प्राची तेंडुलकर, दोन बहिणी, नातवंडे, पुतणे असा आहे.