कान, ऐकण्याच्या क्षमतेची काळजी सर्वांनी घ्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान, ऐकण्याच्या क्षमतेची काळजी सर्वांनी घ्यावी
कान, ऐकण्याच्या क्षमतेची काळजी सर्वांनी घ्यावी

कान, ऐकण्याच्या क्षमतेची काळजी सर्वांनी घ्यावी

sakal_logo
By

rat०४३.txt

बातमी क्र.. ३ (पान ५ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
८६८४७
------------
कान, ऐकण्याच्या क्षमतेची काळजी घ्या

संकेत चाळके ; श्रवणयंत्र लावण्याची लाज बाळगू नका

जागतिक श्रवण दिन--लोगो
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः कान, ऐकण्याच्या क्षमतेची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन आस्था थेरपी सेंटरमधील स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके यांनी केले. जागतिक श्रवणदिनाच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले, भारतात एक हजारामागे ५ ते ६ बालके जन्मतः श्रवण बाधित आढळतात आणि इतर कारणांमुळेदेखील श्रवण बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहिरेपणा किंवा श्रवणदोष निर्माण होण्याची कारणे जन्मतः बहिरेपणा, नात्यातील लग्न, अनुवंशिकता, रेडियेशन, कानातील संक्रमण, कानातील औषधांचा अयोग्य वापर, मोठ्या आवाजाच्या हेडफोनचा अति वापर अशी अनेक आहेत.
श्रवणदिनानिमित्त जाणीव जागृती समाजात करण्याची आवश्यकता आहे. ज्यात कानाची व श्रवणक्षमतेची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. श्रवणदोषाचे जन्मानंतर त्वरित निदान झाले तर श्रवणयंत्र किंवा कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया करून स्पीच थेरपीच्या साहाय्याने मुलांना ऐकायला, बोलायला येऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर निदान व उपचाराचे अनन्यसाधारण महत्व आहे. श्रवणदोषाच्या प्रतिबंधासाठी गर्भवती मातांची काळजी, सुरक्षित प्रसूती, नात्यातील लग्न टाळणे, जन्मानंतर लगेच श्रवण चाचणी करून घेणे, मोठे आवाज टाळणे, हेडफोनचा अतिवापर टाळणे, जंतूसंसर्ग झाल्यास त्वरित कान, नाक, घसा तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वार्धक्यात ऐकू कमी येत असेल तरी चांगल्या प्रतीच्या, क्षमतेनुसार सेट केलेल्या श्रवणयंत्राचा वापर करून श्रवणदोषावर मात करता येते. आपण चष्मा लावण्याची लाज बाळगत नाही तशी श्रवणयंत्र लावण्याची लाज बाळगण्याचे काहीच कारण नाही. अशाप्रकारे प्रतिबंध व उपचार केल्यास श्रवणाच्या नैसर्गिक देणगीसह आयुष्य यशस्वीरित्या जगता येईल, असे चाळके यांनी सांगितले.
--
श्रवणदोषाबाबत समुपदेशन
मारूती मंदिर येथील आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या थेरपी सेंटरमध्ये श्रवणदोषांबाबत सल्ला, समुपदेशन, स्पीच थेरपी, कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळवून देणे इत्यादी सेवा येथे उपलब्ध आहेत, असे आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांनी या वेळी सांगितले.