भविष्यात महाविद्यालयातूनही विद्यार्थी संशोधनाकडे वळतील

भविष्यात महाविद्यालयातूनही विद्यार्थी संशोधनाकडे वळतील

rat०४४.txt

बातमी क्र.. ४ (पान ६ साठी)

देव कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञानदिन

मधुरा पाटील ; कासवांच्या संरक्षणाबाबत चित्रफितीतून जागृती

रत्नागिरी, ता. ४ ः येथील भारत शिक्षणमंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातून भविष्यात महाविद्यालयातूनही विद्यार्थी संशोधनाकडे वळतील अशी अपेक्षा प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी व्यक्त केली. महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रास्ताविक विज्ञान शाखाप्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी केले. पाटील यांनी विज्ञानदिनाची भूमिका स्पष्ट केली. भारतात गेल्या आठ-दहा वर्षांत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन संधी मिळत असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञानदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना कासव संवर्धन उपक्रमाचे चित्रफित दाखवण्यात आली. कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ऑलिव्ह रिडले जातीची मादी कासव समुद्रकिनारी येऊन एक ते दीड फूट खड्डा खणून त्यात आपली अंडी घालते. स्वतःच त्यावरती दाब देऊन वाळू पसरवते आणि समुद्रात निघून जाते; परंतु ही अंडी माणसांकडून, वन्यप्राण्यांकडून उकरून काढून घेतली जातात. परिणामी, नवीन कासवांची उत्पत्ती कमी होत गेली म्हणून या कासवांच्या अंड्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे झाले आणि त्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत आणि त्यांची माहिती चित्रफित दाखवून विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या वेळी बागेश्वरी रेड्डी, अनामिका गुरव या विद्यार्थिनींनी विज्ञानदिनाचे महत्व आणि पार्श्वभूमीवर मनोगते व्यक्त केली. उपप्राचार्या वसुंधरा जाधव, प्राध्यापक, विज्ञान शाखेचे व भूगोल विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. मानसी हर्डीकर यांनी विज्ञान आणि व्यावसायिक मानसिकता यातील दरी साधली जाईल असे प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. आसावरी मयेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com