तेर्सेबांबर्डे येथे काथ्या प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेर्सेबांबर्डे येथे काथ्या प्रशिक्षण
तेर्सेबांबर्डे येथे काथ्या प्रशिक्षण

तेर्सेबांबर्डे येथे काथ्या प्रशिक्षण

sakal_logo
By

86826
तेर्सेबांबर्डे ः काथ्या प्रशिक्षणात सहभागी महिलांना शासनाचे प्रशस्तीपत्र देण्यात आले.

तेर्सेबांबर्डे येथे काथ्या प्रशिक्षण
कुडाळ ः क्वायर बोर्ड आणि नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने काथ्या प्रशिक्षण माध्यमातून तेर्सेबांबर्डे गावातील महिलांचे उद्योगाच्या दिशेने एक पाऊल पडले आहे. गावातील एकूण ५० महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये काथ्या प्रशिक्षणाची मागणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मंत्रालयामार्फत क्वायर बोर्डातर्फे व भाजप महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेर्से, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांच्या पुढाकारातून तीन दिवशीय प्रशिक्षण ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आले. यामध्ये पूर्णवेळ प्रशिक्षण, जेवण व चहा पाण्यासह तसेच एक दिवस कणकवली क्वायर बोर्ड येथे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ४२ महिलांना भारत सरकारच्या क्वायर बोर्डचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. लवकरच यातील इच्छुक २० महिलांना पूर्णवेळ दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच रामचंद्र परब, महेंद्र मेस्त्री, गुणाजी जाधव, माधवी कानडे, रोहिणी हळदणकर, ग्रामसेवक भूषण बालम आदी उपस्थित होते.