दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जमवला 37 हजाराचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जमवला 37 हजाराचा निधी
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जमवला 37 हजाराचा निधी

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जमवला 37 हजाराचा निधी

sakal_logo
By

rat०४११.txt

बातमी क्र. .११ (पान २ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-ratchl४२.jpg ः
८६८१७
चिपळूण ः अपंग मित्र निधी जिद्द शाळेस सुपूर्द करण्यात आला.
---
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जमवला ३७ हजाराचा निधी

मोतिवाले परांजपे हायस्कूल ; जिद्द शाळेस अपंग मित्र निधी सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः शहरातील मोतिवाले परांजपे हायस्कूलने केलेल्या आवाहनास विद्यार्थ्यांनी मोठ्या कौशल्याने ''अपंग मित्र निधी'' जमा केला. विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संपर्क साधून तब्बल ३७ हजार २०८ रुपयाचा निधी संकलित केली. हा निधी जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेस देण्यात आला. मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर व कलाशिक्षक सुनील शिंदे यांनी हा निधी विद्यार्थ्यांकडून स्वीकारला.
शहरातील मोतीवाले परांजपे हायस्कूलमध्ये नुकतीच अपंग मित्र निधी संकलनाबाबत जिद्द शाळेने संकल्पना मांडली. यासाठी १५० कार्ड शाळेकडे देण्यात आली होती. या कार्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कौशल्याने ३७ हजार २०८ निधी जमा केला. ही रक्कम मुख्याध्यापक दिवाडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. एका कार्डावर दोनशे रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ''जिद्द'' शाळेकडून अपंग मित्र प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मतीमंद तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले.
या कामासाठी शाळेचे मुख्याध्यापक जाधव यांनी जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्या शाळेत चांगल्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या घरपरिसरात फिरून नागरिकांशी संपर्क साधला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी यथाशक्ती मदत देण्यात आवाहन केले. त्यास विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या कामी शिक्षक, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. निधी संकलन करण्यासाठी योगदान देणारे सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांचे जिद्द शाळेने आभार मानले.