‘कोमसाप’ला मुंबईत शासनाकडून जागा

‘कोमसाप’ला मुंबईत शासनाकडून जागा

86832
मुंबई ः पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांचा सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शेजारी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ व ज्येष्ठ साहित्यिक.

‘कोमसाप’ला मुंबईत शासनाची जागा

मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मधू मंगेश कर्णिक यांच्या मागणीची दखल

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक, साहित्यिक मधू मंगेश कर्णिक व ‘कोमसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन एक निवेदन दिले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
कर्णिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठी भाषा व साहित्य यांची गेली ६५ वर्षे केलेल्या सेवेतून माझ्या निरीक्षणानुसार, मराठी भाषा व साहित्य यांच्या भल्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मराठी भाषा मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी. यात मराठी भाषा विभागाचे कार्य, कर्नाटक सीमा भागासाठी महाराष्ट्र परिचय केंद्र सुरू करणे, ‘पुस्तकांचे गाव’ योजनेमध्ये मालगुंड येथील केशवसुत स्मारकाचा समावेश करणे, केशवसुत स्मारकाच्या मालगुंड या गावाला पर्यटनाचा दर्जा देणे, मुंबईत घसरता मराठी टक्का, मुंबई विद्यापीठात ‘केशवसुत अध्यासन’ सुरू करणे, मराठी भाषा धोरण, मराठीसाठी प्राधिकरण, मराठी विद्यापीठाची स्थापना, प्रादेशिक साहित्य संस्थांना साहित्य संमेलनासाठी निधी आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुद्यांवर मराठी भाषा मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलविण्याचे आदेश दिले. तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्याचेही आदेश दिले. दरम्यान, भेटीप्रसंगी उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार बच्चू कडू, आमदार नीतेश राणे, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले उपस्थित होते.
--
शासनाचे अभिनंदन
कोमसापच्या अंतर्गत ‘मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठ’ या बॅनरखाली महाराष्ट्रातील २४ संस्थांनी एकत्र येत मराठी भाषा, संस्कृती व साहित्य यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या संस्थांनी आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुंबईत ‘मराठी भाषा भवना’च्या शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदनही मधू मंगेश कर्णिक यांनी केले. मागील अनेक दिवस त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोमसाप’चे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ विविध मागण्यांसाठी सरकार दरबारी प्रयत्नशील होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com