
मराठी गौरव गीत स्पर्धेत मृण्मयी आरोलकर प्रथम
86868
मालवण ः खुल्या मराठी भाषा गौरव गीत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मराठी गौरव गीत स्पर्धेत
मृण्मयी आरोलकर प्रथम
मालवण, ता. ४ : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत येथील नगर वाचन मंदिरच्यावतीने ग्रंथालयात नव्याने दाखल झालेल्या विविध विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन नुकतेच ग्रंथालयाच्या वाचन कक्षामध्ये आयोजित करण्यात आले. यानिमित्त घेतलेल्या मराठी भाषा गौरव गीत स्पर्धेत मृण्मयी आरोलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खुल्या मराठी भाषा गौरव गीत स्पर्धेचे आयोजन ग्रंथालयाच्या सभागृहात केले होते. या स्पर्धेमध्ये मालवण शहर व परिसरातील स्पर्धक सहभागी झाले.
श्री देवी सरस्वती तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी परीक्षक प्रफुल्ल रेवणकर, प्रवीण पारकर संगीत साथ मंगेश कदम, विजय बोवलेकर, ग्रंथपाल संजय शिंदे उपस्थित होते. श्लोक सामंत या बालगायकाच्या ‘स्थान मानाचं देऊ मराठीला’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीतही सादर करण्यात आले. यामध्ये स्पर्धेचे परीक्षक रेवणकर, पारकर व ग्रंथालयाचा कर्मचारी वर्ग सहभागी झाला. स्पर्धेमध्ये ‘ही मायभूमी’, ‘माझ्या मराठीची गोडी’, ‘लाभले आम्हांस भाग्य’, ‘वंदे मराठी’, ‘माझ्या मराठी मातीचा’, ‘हे राष्ट्र देवतांचे’ ही गाणी स्पर्धकांनी सादर करून मराठीची महती सांगितली. मृण्मयी आरोलकर, गायत्री आरोलकर, सुशील प्रभुकेळुसकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन, तरउत्तेजनार्थ माधवी सोनवडेकर, तनुश्री काळसेकर यांनी क्रमांक पटकावला. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. दोन्ही परीक्षकांचा ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. श्रेया चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी प्रतिभा पेडणेकर, रमाकांत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.