आचरा तिठा परिसरातील स्वागत कमान धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचरा तिठा परिसरातील 
स्वागत कमान धोकादायक
आचरा तिठा परिसरातील स्वागत कमान धोकादायक

आचरा तिठा परिसरातील स्वागत कमान धोकादायक

sakal_logo
By

86870
आचरा ः तिठा परिसरातील कमान धोकादायक बनली आहे.

आचरा तिठा परिसरातील
स्वागत कमान धोकादायक
आचरा : कणकवली रस्त्याला लागून आचरा तिठा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारलेली लोखंडी स्वागत कमान गंजल्याने धोकादायक बनली आहे. ही कमान कधीही कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. तातडीने ती बदलण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. आचरा-कणकवली रस्ता नेहमी वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. स्वागत कमान असलेल्या भागात एसटी थांबा, कणकवली भागात जाणाऱ्या सहाआसनी रिक्षा थांबा आहे. यामुळे या भागात माणसांची वर्दळ असते. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारलेली लोखंडी स्वागत कमान गंजल्याने कधीही कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गाड्यांच्या प्रतीक्षेतील प्रवाशांना धोका निर्माण झाला आहे. ही कमान काढून टाकण्याची मागणी आचरा ग्रामस्थांकडून केली जात आहे.
---
86869
काळसे ः मसाला युनिटचे उद्घाटन करताना सरपंच विशाखा काळसेकर.

काळसेत मसाला युनिटचे उद्‍घाटन
मालवण : तालुक्यातील काळसे येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत काळसे येथील लाभार्थी दिव्या परब यांच्या मसाला युनिटचे उद्घाटन काळसे सरपंच विशाखा काळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी, कृषी पर्यवेक्षक डी. डी. गावडे, कृषी सहायक व्ही. आर. कुबल, आत्मा समन्वयक नीलेश गोसावी, कॅनरा बॅंक व्यवस्थापक गावस्कर, ग्रामस्थ, महिला वर्ग, शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी गोसावी, कृषी पर्यवेक्षक गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.