देवगडमध्ये नगरपंचायतीतर्फे प्लास्टिकबाबत जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये नगरपंचायतीतर्फे
प्लास्टिकबाबत जनजागृती
देवगडमध्ये नगरपंचायतीतर्फे प्लास्टिकबाबत जनजागृती

देवगडमध्ये नगरपंचायतीतर्फे प्लास्टिकबाबत जनजागृती

sakal_logo
By

86881
देवगड ः येथील नगरपंचायतीच्यावतीने प्लास्टिक वापराबाबत आठवडी बाजारात जनजागृती करण्यात आली.

देवगडमध्ये नगरपंचायतीतर्फे
प्लास्टिकबाबत जनजागृती
देवगड, ता. ३ ः येथील आठवडी बाजारात देवगड जामसंडे नगरपंचायतीतर्फे प्लास्टिक वापराबाबत जनजागृती करण्यात आली. एकल वापर प्लास्टिक बंदी विषयी ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी १२० मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक ताब्यात घेण्यात आले.
आज येथील आठवडी बाजारात नगरपंचायत प्रशासनातर्फे प्लास्टिक वापराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहर समन्वयक प्रणव घोरपडे, सफाई कर्मचारी अमोल चव्हाण, रूपेश मणचेकर, किशोर सावंत, मंगेश देवगडकर, विशाल देवगडकर, दीपक धुरी, दीपक चिंदरकर, योगेंद्र कणेरकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी आठवडी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांना माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले. प्लास्टिक बंदीबाबतचे निकष समजावून सांगण्यात आले. १२० मायक्रोनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक ताब्यात घेण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन यावेळी केले.