महावितरणतर्फे ओरोसला ‘लाईनमन दिन’ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणतर्फे ओरोसला 
‘लाईनमन दिन’ उत्साहात
महावितरणतर्फे ओरोसला ‘लाईनमन दिन’ उत्साहात

महावितरणतर्फे ओरोसला ‘लाईनमन दिन’ उत्साहात

sakal_logo
By

86878
सिंधुदुर्गनगरी ः लाईनमन दिनानिमित्त वीज कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे.

महावितरणतर्फे ओरोसला
‘लाईनमन दिन’ उत्साहात
ओरोस ः लाईनमन हा महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे लाईनमन ऊन, वारा, पाऊस तसेच इतर खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात. या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी इथे आलो आहे. आपण सर्व जिल्हावासीयांना नियमित सुरळीत सेवा देत असून त्याबद्दल मी आभारी आहे, असे सांगत भाजप प्रदेश माजी खासदार सचिव नीलेश राणे यांनी ओरोस महावितरण कार्यालय येथे आज लाईनमन दिनानिमित्त वीज कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. विजेच्या एका बटणामागे विस्तारलेल्या मोठ्या वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या विजेला सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीज क्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्राच्या निर्देशानुसार आज ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून ओरोस महावितरण कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, देवेन सामंत, योगेश घाडी, आबा सावंत, मनोरंजन सावंत, साई दळवी, तुषार सावंत आदी उपस्थित होते.
.................
86880
दोडामार्ग ः ‘ज्ञानी मी होणार’ स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्रे देण्यात आली.

घोटगे-वायंगणतड शाळेचे यश
दोडामार्ग ः जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ज्ञानी मी होणार या प्रश्नमंजुषेत १०० पैकी १०० गुण मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगे-वायंगणतड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी यश संपदान केले. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल दोडामार्ग तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. घोटगे-वायंगणतड प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेत १०० पैकी १०० गुण मिळवीत आपल्या गुणवत्तेचे दर्शन जिल्ह्यातील इतर शाळांना घडविले. यात चौथीतील चिन्मय तोरस्कर व तिसरीतील आराध्या नाईक यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. प्रशालेचे शिक्षक डॉ. उत्तम तानवडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. विजेत्या विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, केंद्रप्रमुख सूर्यकांत नाईक, शिक्षण विस्तार अधिकारी दीपा दळवी यांनी अभिनंदन केले.