संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat०४१६. txt

बातमी क्र..१६ (पान २ साठी)

मिरजोळेतील पालखी महोत्सवात प्रो कबड्डी स्पर्धा

रत्नागिरी ः साईशक्ती क्रीडामंडळ मिरजोळेतर्फे श्री साई भंडारा पालखी महोत्सव २०२३ निमित्त तालुक्यातील साईशक्ती प्रीमिअर लिग २०२३ दुसऱ्या वर्षात भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा २६ ते २८ मार्च या कालावधीत खेळवल्या जाणार आहेत. विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान केले जाणार आहे तसेच स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट चढाईपटू व सर्वोकृष्ट पकड यासाठी विविध बक्षिसे देऊन खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी एका खेळाडूची निवड उत्कृष्ट खेळाडू म्हणून करण्यात येणार असून त्याला आकर्षक बक्षिस देऊन गौरवण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची मंडळाच्यावतीने भोजनव्यवस्था करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये १० खेळाडूंचे ८ संघ तसेच ८ प्रशिक्षक निवडण्यात येणार आहेत. ही निवड मंडळाची निवड समिती करणार आहे. स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या खेळाडूंनी अधिक माहितीसाठी संतोष मयेकर, संकेत भाटकर, साईप्रसाद कीर, साईराज मयेकर यांच्याशी संपर्क साधावा.
--

फोटो ओळी
-rat४p८.jpg ः
८६८१५
गुहागर ः अशोक मराठे यांनी पाच शाळांकडे दृकश्राव्य सॉफ्टवेअर संच सुपूर्द केले.
--
पाच शाळांना मोफत दृकश्राव्य सॉफ्टवेअरची भेट

गुहागर ः चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीतर्फे अडूर माध्यमिक विद्यालय, वाघांबे विद्यालय, अडूर शाळा नं. १, अडूर भाटले शाळा आणि नरवण शाळा या पाच शाळांना मोफत पहिली ते दहावीचे दृकश्राव्य सॉफ्टवेअर देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अडूर विद्यालयात करण्यात आले होते. चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे प्रमुख संजय देशपांडे, प्रज्ञा देशपांडे यांनी समर्थ भारत अभियान प्रकल्प पुण्यात राबवला. त्याचप्रकारे कोकणातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी स्मार्ट अभ्यासिकेची कल्पना त्यांच्यामार्फत अथक परिश्रमातून सुरू केली. दृकश्राव्य सॉफ्टवेअरचे मोफत वितरण अशोक मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. संजय देशपांडे यांनी स्मार्ट अभ्यासिकेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला विष्णू नराम, डॉ. कैलास वैद्य, आचार्य विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग कापले, अडूरचे ग्रामविकास अधिकारी खोत, डॉ. वैभव गाडगीळ, संतोष विचारे, मुख्याध्यापक अभय जोशी, आनंदराव चव्हाण आदी उपस्थित होते.
--
फोटो ओळी
-rat४p१६.jpg ः
८६८६०
गावतळे ः गावतळे येथे खासदार सुनील तटकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना सरपंच विधी पवार.
---
गावतळेतील विकासकामांबाबत खासदार तटकरेंना निवेदन

गावतळे ः दापोली तालुक्यातील गावतळे येथे खासदार सुनील तटकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सरपंच विधी पवार व उपसरपंच एन. वाय. पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये मौजे गावतळे स्मशाभूमीला वॉल कंपाऊंड बांधणे, गुरववाडी ते हनुमान मंदिर रस्त्याला दुतर्फा बांध बांधणे, गुरववाडी ते हनुमान मंदिरकडून आरोग्य उपकेंद्र रस्ता डांबरीकरण, गुरववाडी ते उगवतवाडी रस्ता डांबरीकरण, दत्तवाडी ते झोलाईदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, झोलाईदेवी मंदिर ते गणपती विसर्जनसाठी छोटा तलावकडे जाणारा रस्ता तयार करणे आदी विकासकामांचा उल्लेख होता. या वेळी माजी आमदार संजय कदम, भाई पवार, नाना म्हापदी, राम पवार, प्रणव पवार, बाळू पवार, अक्षता पवार, राजाराम रसाळ आदी उपस्थित होते.
--

फोटो ओळी
-rat४p१९.jpg ः
८६८६४
दापोली ः उन्हवरे येथे विकासकामाचे उद्घाटन करताना खासदार सुनील तटकरे.
------------
उन्हवरेत विकासकामांचे उदघाटन

दापोली ः तालुक्यातील उन्हवरे-वावघर-फरारे ग्रुप ग्रामपंचायतीत विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार संजय कदम, मुजीब रूमाने, संदीप राजपुरे, मोहन मुळे, शंकर कांगणे आदी उपस्थित होते. वावघर कब्रस्थान वॉल कंपाउंड बांधणे कामाचे भूमिपूजन, ग्रामपाणी शौचालय उद्घाटन, ग्रामपाणी स्नानगृह इमारतीचे भूमिपूजन, उन्हवरे जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.