कुचांबे-येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुचांबे-येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त
कुचांबे-येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त

कुचांबे-येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त

sakal_logo
By

rat०४२०.txt

बातमी क्र..२० (पान २ साठी)

कुचांबे-येडगेवाडी रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त

१० मार्चपासून सुरवात ; कार्यकारी अभियंत्यांनी दिल्या सूचना

संगमेश्वर, ता. ४ ः तालुक्यातील आरवली-मुरडव-कुंभारखाणी-कुचांबे-राजिवली-रातांबी-येडगेवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटावणे यांनी १० मार्चपासून कामाला सुरवात करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी श्री. ओटावणे यांची भेट घेऊन आढावा घेण्याची विनंती केली होती.
कार्यकारी अभियंता अमोल ओटावणे यांनी ३ मार्चला बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये १० मार्चपासून काम सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे, बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अभियंता पूजा इंगवले, शाखा अभियंता अक्षय बोरसे, जाहीद खान आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कुचांबे ते येडगेवाडी रस्ता डांबरीकरणासाठी २०२१ मध्ये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती; मात्र काम अर्धवट होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओटावणे यांनी ४ फेब्रुवारी २०२३ ला येडगेवाडीला भेट देत या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली होती. त्यांच्या पाहणी दौऱ्यात या कामातील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन येडगे यांना दिले होते. त्याप्रमाणे ३ मार्चला रत्नागिरीतील कार्यालयात आढावा बैठक घेऊन कामातील त्रुटी दूर करत १० मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
--