
चुनाकोळवण ते कळसवली रस्ता मंजुरी
चुनाकोळवण ते कळसवली रस्ता मंजुरी
रत्नागिरी, ता. ४ः चुनाकोळवण से कळसवली साडेपाच किमी अंतर असून या गावांना जोडणारा रस्ता ४५ वर्षे जुना आहे. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून वर्षे अंबिकेश्वर प्रतिष्ठान चुनाकोळवणच्यावतीने प्रयत्न सुरू होते. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कळसवली ते चुनाकोळवण साडेपाच किमी रस्ता डांबरीकरण मंजुरीचे पत्र अध्यक्ष संजय पाटणकर यांना दिले. त्यामुळे प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश आले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने रस्ता डांबरीकरणासाठी मागणी करण्यात येत होती. चुनाकोळवण गावातील निवखोलवाडी, गुरववाडी, बाईतवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी या ५ वाड्यांना जोडणारा रस्ता गेली कित्येक वर्षे अंबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. अनेकवेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही रस्त्याचे डांबरीकरण होत नव्हते. वृद्ध, अपंग, आजारी व्यक्ती व शाळकरी विद्यार्थी यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता डांबरीकरण मंजुरीचे पत्र आज अध्यक्ष संजय पाटणकर यांना दिले. पालकमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अंबिकेश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामीण व मुंबई तसेच गावप्रमुख मधुकर मटकर व चंद्रकांत मटकर यांनी पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.