-सावर्डेतील प्रीमियर लीग रायगड रॉयलन्सने जिंकली

-सावर्डेतील प्रीमियर लीग रायगड रॉयलन्सने जिंकली

rat०४३१.txt

बातमी क्र. .३१ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat४p२३.jpg ः
८६८९९
सावर्डे ः प्रीमियम लीगच्या बक्षीस समारंभात बोलताना आमदार शेखर निकम.
---
सावर्डेतील प्रीमियर लीग रायगड रॉयलन्सने जिंकली

सावर्डे, ता. ४ ः आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त गोविंदराव निकम क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने आयपीएल धर्तीवर प्रथमच सावर्डेमध्ये प्रीमियम लीग उत्साहात झाली. स्पर्धेत रायगड रॉयल्स संघ अजिंक्य ठरला.
अॅकॅडमीचे अध्यक्ष व युवानेते अनिरुद्ध निकम यांच्या संकल्पनेतून स्पर्धा दहिवली येथील गोविंदराव निकम क्रीडानगरीत भरविण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनितकुमार पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रीमियर लीगमध्ये रायगड रॉयल्स, कोंढाणा फायटर, शिवनेरी चॅलेंजर्स आणि पन्हाळा वॉरियर्स अशा चार संघांचा समावेश आहे. या लीगमध्ये अंतिम सामना रायगड रॉयल्स व कोंडाणा फायटर या दोन संघात रंगला. यामध्ये रायगड रॉयल्स संघ अजिंक्य ठरला. आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत या लीगचा बक्षीस वितरण सोहळा झाला.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com