खेळातही करिअर करण्यासाठी प्रयत्न करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळातही करिअर करण्यासाठी प्रयत्न करा
खेळातही करिअर करण्यासाठी प्रयत्न करा

खेळातही करिअर करण्यासाठी प्रयत्न करा

sakal_logo
By

rat०४३२.txt

बातमी क्र..३२ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat४p२५.jpg-
८६९०१
डेरवण ः डॉ. नीलिमा देशपांडे यांच्या हस्ते ऑलिम्पिक प्रदर्शनाचेदेखील उद्घाटन करण्यात आले.
--

खेळातही करिअर करण्यासाठी प्रयत्न करा

डॉ. नीलिमा देशपांडे; डेरवणला युथ गेम्स स्पर्धेचे उदघाटन

खेड, ता. ४ ः डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे क्रीडासंकूल हे देशातील आधुनिक क्रीडासंकूल आहे. क्रीडाक्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी आता उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळातही करिअर करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन पतियाला येथील नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडासंस्थेतील सीनियर अॅथलेटिक्स प्रशिक्षक डॉ. नीलिमा देशपांडे यांनी येथे केले.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टतर्फे डेरवण युथ गेम्स स्पर्धेचे उद्घाटन डॉ. नीलिमा देशपांडे यांच्या हस्ते झाले. या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी उद्योजक कमलेश जोशी, बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटलचे रेडियोलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील, स्पोर्ट्स डायरेक्टर श्रीकांत पराडकर, शाळेच्या संचालिका शरयू यशवंतराव उपस्थित होते.
उद्योजक कमलेश जोशी यांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम आणि खेळ या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. लहान वयातच खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे डेरवण युथ गेम्सचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. डेरवण युथ गेम्समध्ये सहा सांघिक, १२ वैयक्तिक क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. पाच वयोगटात होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात साडेचार हजारांवर खेळाडू सहभागी झालेले आहेत.