पाडलोस-केणीवाडा शाळेचे शेतकरी नृत्य लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाडलोस-केणीवाडा शाळेचे
शेतकरी नृत्य लक्षवेधी
पाडलोस-केणीवाडा शाळेचे शेतकरी नृत्य लक्षवेधी

पाडलोस-केणीवाडा शाळेचे शेतकरी नृत्य लक्षवेधी

sakal_logo
By

86919
पाडलोस ः शेतकरी नृत्य सादर करताना केणीवाडा शाळेतील मुले. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

पाडलोस-केणीवाडा शाळेचे
शेतकरी नृत्य लक्षवेधी
बांदा, ता. ४ ः पाडलोस गाव व्हॉट्सअप ग्रुप आयोजित ‘जल्लोष २०२३’ कार्यक्रमात केणीवाडा शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शेतकरी नृत्य लक्षवेधी ठरले. तसेच शिवजयंतीनिमित्त ग्रामस्थांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गावात अनेक शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त गावातील महिला व पुरुषांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धांचा निकाल अनुक्रमे असा ः रांगोळी स्पर्धा-सायली गावडे, साक्षी गावडे, यशदीप गावडे. बादलीत बॉल टाकणे-अर्पिता गावडे, कविता आंबेकर, अनुजा गावडे. संगीत खुर्ची (महिला)-ललिता पाडलोसकर, अनुजा गावडे, शीतल गावडे. संगीत खुर्ची (मुली)- अनुष्का पाडलोसकर, मीनाक्षी सावंत, अंकिता गावडे. संगीत खुर्ची (पुरुष)-रोहित गावडे, विश्राम गावडे, गंगाराम गावडे. गावातील कर्तृत्ववान व्यक्तींचा ग्रुपच्यावतीने सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील विविध भजन स्पर्धांमध्ये यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पाडलोसचा कलागौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले पाडलोसचे सुपुत्र हवालदार नीलेश गावडे यांचा अध्यक्ष विश्राम गावडे यांच्या हस्ते देशसेवा पुरस्कार देऊन सन्मान केला. गावातील महिलांनी नृत्य व तरुणांनी सामाजिक नाट्यप्रयोग सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शेटकर, शिवराम पाडलोसकर यांनी केले. ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश करमळकर यांनी आभार मानले.