रत्नागिरी-लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी
रत्नागिरी-लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

रत्नागिरी-लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी

sakal_logo
By

लैंगिक अत्याचारप्रकरणी
एकास २० वर्षे सक्तमजुरी

बहीण व मित्रालाही पाच वर्षे सक्तमजुरीसह दंड

रत्नागिरी, ता. ४ ः अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून संगनमताने तिचे अपहरण केल्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५१ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच त्याच्या बहिणीला आणि मित्राला प्रत्येकी ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १६ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
मुख्य आरोपी अक्षय विष्णू घाटगे (वय २१), त्याची बहीण आरती संजय घाटगे (२६) आणि मित्र गोश्फाक सय्यद ऊर्फ राजा सय्यद (२१) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित परराज्यातील आहे. अक्षय नोकरीला असताना त्यांची ओळख झाली आणि प्रेमसंबंध निर्माण झाले होते, मात्र ही बाब पीडितेच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. २३ डिसेंबर २०२० अक्षयने पीडितेला घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर घरातील विरोधामुळे २८ डिसेंबर २०२० पीडितेला फूस लावून अक्षयने पळवून नेले. याबाबत तिच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
अक्षयने तिला त्याचा मित्र गोश्फाक सय्यदच्या घरी नेऊन ठेवले होते. त्यानंतर ६ जानेवारी २०२१ सकाळी पाच वाजता अक्षय आणि त्याची बहीण पीडितेला भेटण्यासाठी गोश्फाकच्या घरी गेले होते. तेव्हा अक्षयने तिला आरती आणि गोश्फाकसोबत दुचाकीवरून आंबा येथे जाण्यास सांगितले. तिथून रात्री ते रत्नागिरीत परतले असता पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी करून कलम ३७६, ३६५, ३६६ अ आणि पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याचा निकाल शनिवारी (ता. ४) विशेष पोक्सो न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पराज शेट्ये यांनी १५ साक्षीदार तपासले. न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी या खटल्याचा निकाल देताना मुख्य आरोपी अक्षय घाटगेला बलात्कार, तसेच अपहरणमध्ये पोक्सोंतर्गत दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी आणि ५१ हजार रुपये दंड, त्याची बहीण आरती घाटगे आणि मित्र गोश्फाक सय्यदला कलम ३६३, ३६५, ३६६ अ आणि ३६६ मध्ये दोषी ठरवून प्रत्येकी ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १६ हजार रुपये दंड शिक्षा ठोठावली. या खटल्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी केला असून, पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सोनाली शिंदे यांनी केला.