नाईकांना जनता घरी बसवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईकांना जनता घरी बसवणार
नाईकांना जनता घरी बसवणार

नाईकांना जनता घरी बसवणार

sakal_logo
By

86867
मालवण ः ‘भाजयुमो’च्या मेळाव्यात माजी खासदार नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवदत्त सामंत, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, भाई सावंत, धोंडी चिंदरकर आदी उपस्थित होते.


नाईकांना जनता घरी बसवणार

नीलेश राणेंचा निशाणा; मालवणात ‘भाजयुमो’चा युवक संवाद मेळावा


सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ४ : भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपमध्ये कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. संधी प्रत्येकाला मिळते. प्रामाणिक कामातून प्रत्येकाने यश मिळविले पाहिजे. आगामी लोकसभा आणि राज्यातील सर्व निवडणुकांत भाजप जिंकेल; मात्र युवकांचे त्यात योगदान किती, हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ध्येयवेडे होऊन काम करा. जनतेची सेवा करा, असे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केले. आगामी मालवण पालिका निवडणुकीत गुलाल फटाके भाजपचेच असणार, सर्व निवडणुकांत १०० टक्के यश भाजपला मिळणार आणि आमदार वैभव नाईकांना जनता घरी बसवणार, असे सांगत नीलेश राणे यांनी मालवणात दरवर्षी भव्यदिव्य पर्यटन सांस्कृतिक महोत्सव भरविणार असल्याचे स्पष्ट केले.
‘भाजयुमो’ मालवण शहर युवक संवाद मेळावा येथील दैवज्ञ भवन सभागृहात झाला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवदत्त सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सुदेश आचरेकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, उद्योजक दीपक परब, शहर प्रभारी विजय केनवडेकर, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, अभय कदम, भाई मांजरेकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहराध्यक्ष ललित चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकीत वराडकर, सरचिटणीस निशय पालेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर आदी उपस्थित होते.
भाजयुमो शहराध्यक्ष चव्हाण यांनी प्रास्ताविक करत प्रथम देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी, या भाजपच्या ध्येय धोरणानुसार काम करून संघटना अधिक मजबूत करत काम करूया, असे आवाहन केले. जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सुदेश आचरेकर यांनीही विचार मांडले. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शहरातील युवक पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आल्या. नीलेश राणे, देवदत्त सामंत यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबाबत ललित चव्हाण व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
---
...अन् ठाकरेंची सत्ताच गेली
श्री. राणे म्हणाले, ‘‘केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी जिल्ह्याला एका वेगळ्या उंचीवर नेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर व खंबीर नेतृत्वाखाली ते देशपातळीवर काम करत आहेत. त्यांनी जिल्ह्यात केलेल्या कामाला तोड नाही. यापुढेही मालवण, कुडाळसह जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा विकास निधी आणायचा आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हीच खरी पक्षाची संपत्ती आहे. सत्तेची नशा ठाकरेंच्या डोक्यात गेली आणि सत्ता गेली. आज अनेक पक्षांत बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली नेतेमंडळी असून हे बाळासाहेबांचे कर्तृत्व आहे.’’