इन्सुलीत १९ लाखांची दारू जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीत १९ लाखांची दारू जप्त
इन्सुलीत १९ लाखांची दारू जप्त

इन्सुलीत १९ लाखांची दारू जप्त

sakal_logo
By

86973
इन्सुली ः येथे ताब्यात घेतलेल्या मुद्देमालासह पोलिस पथक.


इन्सुलीत १९ लाखांची दारू जप्त

एलसीबीची कारवाई; शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः शिमगोत्सव दोन दिवसांवर आलेला असताना गोवा येथून महाराष्ट्रात बेकायदा होत असलेल्या अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्गच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत १९ लाखांची गोवा बनावटीची दारू व दहा लाख किंमतीचा टेम्पो, असा एकूण २९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी गणेश सुभाष पाटील (वय ४५, राठी देवपूर, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई काल (ता. ३) रात्री पावणेबाराच्या सुमारास इन्सुली सात जांभळी सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली. संशयिताविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, स्थानिक गुन्हा निवेषण विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, गुरुनाथ कोयंडे, पोलिस नाईक अमित तेली, रवी इंगळे, यशवंत आरमारकर यांनी केली.