खोक्रल पुलाचे काम अखेर सुरू

खोक्रल पुलाचे काम अखेर सुरू

86978
खोक्रल ः पुलाच्या प्रारंभ प्रसंगी सरपंच देवेंद्र शेटकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष पांडुरंग गवस आदी.

खोक्रल पुलाचे काम अखेर सुरू

दीर्घकाळ मागणी; स्थानिकांच्या संघर्षाला यश

दोडामार्ग, ता. ४ ः गेली कित्येक वर्षे खोक्रलवासीयांना प्रतीक्षा असलेल्या पुलाच्या कामाला अखेर काल (ता. ३) सुरुवात करण्यात आली. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग गवस यांच्या हस्ते श्रीफळ वाढून कामाचा प्रारंभ करण्यात आला. सरपंच व ग्रामस्थ यांच्या पुलासाठी चाललेल्या संघर्षाला अखेर यश मिळाले.
खोक्रल तसेच मांगेली गावात जाणाऱ्या मार्गावरील दोन्हय या नदीपात्रावर पूर्वीचे कमी उंचीचे पूल होते. हे पूल पावसाळ्यात पाण्याखाली जायचे. परिणामी खोक्रल व मांगेली ग्रामस्थांची वाहतुकीसाठी परवड व्हायची. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल होण्याची गेली वीस वर्षांपासून मागणी होती. अनेक प्रयत्न ग्रामस्थ करीत होते. सरपंच देवेंद्र शेटकर यांनी आपल्या मागच्या कार्यकाळात या पुलाच्या मंजुरीसाठी शर्तीचे प्रयत्न करून पुलाला मंजुरी मिळवून आणली. आर्थिक बजेटमधून हे पूल मंजूर झाले असल्याची माहिती सरपंच शेटकर यांनी माहिती दिली. नवीन व उंचीचे सुसज्ज पूल व्हावे, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे पावसाळ्यात होणारी परवड आता थांबणार असून याचे आपल्याला समाधान आहे, असेही ते म्हणाले. काल या पुलाच्या कामाला देवस्थान कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग गवस यांचा हस्ते श्रीफळ वाढवून सुरुवात करण्यात आली. यावेळी खोक्रल गावचे सरपंच शेटकर, उपसरपंच अंजू गवस, माजी उपसरपंच गोपाळ नाईक, सदस्य भरत गवस, सागर नाईक, ग्रामस्थ दत्ताराम गवस, गोविंद गवस, सुरेश गवस, रवींद्र गवस, कृष्णा गवस, गंगाराम गवस, नवनाथ गवस, कृष्णा गवस, साईनाथ गवस, तेजस कणकुबकर, रोहित कणकुबकर, प्रमोद गवस, गिरीश गवस, शुभम गवस, पांडुरंग गवस, अमित गवस, सोनम नाईक, साधना गवस, कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे व ठेकेदार उपस्थित होते.
.................
चौकट
चव्हाण, केसरकर यांचे मानले आभार
खोक्रल येथे सुसज्ज असे पूल होण्याची गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मागणी होती. त्याबाबत पाठपुरावा देखील सुरू होता. ग्रामस्थांची मागणीची लक्षात घेऊन शालेयमंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पूर्तता केल्याने सरपंच देवेंद्र शेटकर यांनी ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com