थकित पाणीपट्टी विरोधात 
कुडाळ येथे मोहीम तीव्र

थकित पाणीपट्टी विरोधात कुडाळ येथे मोहीम तीव्र

थकित पाणीपट्टी विरोधात
कुडाळ येथे मोहीम तीव्र
कुडाळ, ता. ४ ः थकित पाणीपट्टीविरोधात येथील नगरपंचायतीने मोहीम उघडली आहे. दीर्घकाळ पाणीपट्टी न भरलेल्या २० जोडण्या आज बंद करण्यात आल्या. ही कारवाई मुख्याधिकारी सूरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, पथक प्रमुख तथा विभाग प्रमुख विजय आजगावकर, लिपिक सचिन म्हाडदळकर, वसुली कर्मचारी वामन राणे, यशंवत कुडाळकर, चंद्रशेखर आळवे, पुंडलिक होडावडेकर, चंद्रकांत कुंभार, साईप्रसाद खोत यांच्या पथकाने केली.
येथील नगरपंचायतीच्या पाणीपट्टी विभागाकडून ३६ लक्ष अधिकची पाणीपट्टी थकविणाऱ्या २३६ नळधारकांना पाणीपट्टी बंद करण्यासाठीची नोटीस पाठविली होती. पाणीपट्टी न भरल्यास पाणीपट्टी बंद करणार असल्याचा इशारा संबंधित थकबाकीदारांना देण्यात आला होता. थकित पाणीपट्टी बंद करण्यासाठी नगरपंचायतीने पथके तयार केली आहेत. वर्षोनुवर्षे थकित पाणीपट्टी असणाऱ्या एकूण २० नळजोडण्या बंद करण्यात आल्या. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून पाणीपट्टी थकित असलेल्या नळधारकांकडून पाणीपट्टी भरून घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेत वसुली पथक तयार केले आहे. हे पथक थकबाकीदारापर्यंत पोहोचून त्यांच्याकडून पाणीपट्टी वसूल करून घेत आहे. उर्वरित पाणीपट्टी व मालमत्ता थकबाकी असलेल्यांची नावे वृत्तपत्र व इतर माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे वेळेत पाणीपट्टी व मालमत्ताकर भरून जप्तीची व पाणीपुरवठा बंद करण्याची कार्यवाही टाळावी, असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुख्याधिकारी कांबळे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com