अपहार प्रकरणी संशयितास कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहार प्रकरणी संशयितास कोठडी
अपहार प्रकरणी संशयितास कोठडी

अपहार प्रकरणी संशयितास कोठडी

sakal_logo
By

अपहार प्रकरणी संशयितास कोठडी
ओरोस ः जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आर्थिक अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम शेषराव फुसांडे (वय ३६, यवतमाळ) याला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अटक केली. येथील न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क व अनामत रक्कम शासकीय खात्यावर जमा न करता वैयक्तिक खात्यावर जमा केल्याप्रकरणी तत्कालीन संशयित वरिष्ठ लिपिक फुसांडे याच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात २५ जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. याबाबत मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या चौकशीत ४ लाख ३२ हजार २५० रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात फौजदारी दाखल केली होती. त्यानुसार संशयित फुसांडे यांच्यावर २५ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रभारी हेमंत देवरे यांच्या नेतृत्वाखाली हेडकॉन्स्टेबल गुरुदास पडावे, कॉन्स्टेबल वैभव जाधव यांनी संशयित फुसांडे यांच्या यवतमाळ जिल्ह्यात जात त्यांना बुधवारी (ता. १) ताब्यात घेतले. २ ला जिल्ह्यात आणले. तर ३ ला जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
.......................
आरे येथून वृद्धा बेपत्ता
देवगड : आरे-बोडदेवाडी (ता.देवगड) येथील एक वृद्धा बेपत्ता झाली आहे. वैजयंती अशोक मुणगेकर (वय ७०), असे त्यांचे नाव आहे. सोमवारी (ता. २७) दुपारी दोनच्या सुमारास घरातून त्या निघून गेल्या, त्या परत न आल्याने आज तिच्या नातेवाईकांनी येथील पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनेची येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. देवगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.