मंडणगड शहरात शिमगोत्सवाची धुम टिपेला

मंडणगड शहरात शिमगोत्सवाची धुम टिपेला

टो ओळी
rat५p१३.jpgKOP२३L८७०४२
मंडणगड: शहरातील शिमगोत्सवात दाखल झालेली टाकवली ग्रामदेवतेची पालखी व संकासुर.

मंडणगड शहरात शिमगोत्सवाची धुम टिपेला
गावोगावच्या पालख्यांचे स्वागत ; होमाला परिसर दुमदुमला
मंडणगड,ता. ५ःकोकणात शिमगोत्सव बहरात आलेला असताना द्वादशीला म्हणजे सहाव्या होमाचे दिवशी (ता. ४ ) तालुक्यातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या मंडणगड शहराचे भेटीस आल्याने शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले. खालु बाजाचा ढोलचा आवाज, ताशाचा कडकडाट व या सर्वावर टिपेला जाणारा ताडाचे पानाचे सनईचा सुर यामुळे शहारात एक वेगळ्या प्रकारचा संगीतमय वातावरण बनले.
पहिल्या होमानंतर सीमोल्लघन करुन गावागावात फिरणाऱ्या पालख्या व खेळी मोठ्य़ा होमाला परतण्यापुर्वी मंडणगड शहरास भेट देतात. शनिवारी याकरिता शहरातील अनेक प्रभागात नागरिकांना विशेष व्यवस्था उभ्या केल्या होत्या. नागरिकानीही आपली घरे ग्रामदेवतांचे स्वागतासाठी सज्ज ठेवली होती. माहू, टाकवली, कोन्हवली, बोरघर, तुळशी, कोन्हवली, वडवली, आंबवणे खुर्द, कोंझऱ या गावातील ग्रामदेवतांच्या पालख्यां मंडणगड शहरात आलेल्या होत्या. याशिवाय पाट गावाचा डेरा, व कुंभार्ली येथील कोळी नृत्यू यानंतर कोकण मातीतील शिमगोत्सवाचे वेगळेपण दिसून आले. टाकवली व कोन्हवली येथील पालख्यांसमवेत महादेवांचा रुप असलेला संकासुरही फिरत होता. त्यामुळे बालगोपाळमध्ये विशेष आर्कषण होते. शहरातील बालगोपाळ संकुराला बघून पळुन जाण्यापेक्षा खालुच्या तालावर त्याच्याबरोबर अत्यानंदाने नाचताना दिसून येत होते. पुर्ण दिवसभर शिमगोत्सवाची वर्दळ सुरु होती. यानिमित्ताने शहरात पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गावागावातून आलेल्या ग्रामस्थांनी भेट देवून पालखी नृत्य कला सादर केली. याशिवाय आजबाजूच्या गावातील खेळीही शहरातील शिमगोत्सवात सहभागी झालेले दिसून आले.


सर्व पालख्या आपआपल्या गावी

अनेक पालख्यांनी दिवसभर फिरुन आपआपल्या मान्यकरांच्या घरी विश्रांती घेतल्यावर रविवार दिवसभर शिमगोत्सवाची धामधुम सुरु होती. शहरातील प्रत्येक वाडीस भेट देवून सायंकाळी उशीरा सर्व पालख्या आपआपल्या गावी परत गेल्या. शिमगोत्सवाच्या तालुक्यातील सांस्कृती प्रथा पंरपरांचे मोठ्या उत्साहात श्रध्देने अवलोकन करताना येथील नागरिक बालगोपाळ दिसून आल्याने या काळात येथील वातवरण भक्तीमय बनुन गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com