
संक्षिप्त
rat५p१४.jpg साखरपा : विजेत्या संघाबरोबर मुख्याध्यापिका लिना कबनूरकर आणि विज्ञान शिक्षिका स्वरूपा बंडबे
कबनूरकर स्कूलमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा
साखरपा : कोंडगाव येथील दत्तात्रय कबनूरकर स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा केला. निमित्त एका विज्ञान प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापिका लिना कबनूरकर यांच्या हस्ते सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले. स्वरूपा बंडबे, निधी जोयशी, गणित शिक्षक अमित पंडित यांनी रमण यांच्या रमण परिणाम ह्या शोधाबद्दल आणि त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराबद्दल माहिती दिली. रमण यांचे पुतणे चंद्रशेखर यांनाही नोबेल पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिली ते पाचवी आणि सहावी ते नववी अशा दोन गटात झालेल्या ह्या स्पर्धेत लहान गटात माही जाधव, निषाध जोगळेकर, क्षितिजा कोलते, तीर्था लाड, हर्षवर्धन पाटील हे विजयी झाले. तर सहावी ते नववी गटात संस्कृति शिवगण, हंसीता पांगळे, इशिता कदम, हर्ष कोलते, राजवर्धन पाटील आणि निखिल पवार हे स्पर्धक विजयी झाले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली
rat५p१५.jpg KOP२३L८७०४४
साखरपा : केंद्रशाळेचा १५४ वा वाढदिवस साजरा करताना शिक्षक, विद्यार्थी आणि पालक
साखरपा केंद्रशाळेचा १५४ वा वाढदिवस उत्साहात
साखरपा : येथील साखरपा नंबर १ केंद्रशाळेचा १५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्याने विद्यार्थी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कोंडगावमधील ग्रामस्थ कै. गोपाळ विठ्ठल केतकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून ३ मार्च १८६९ ह्या दिवशी पहिली खाजगी शाळा सुरू केली. त्या शाळेला १८८५ साली शासनमान्यता मिळाली. आज ही शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर या नावानं ओळखली जाते. हीच शाळा म्हणजे साखरपा नंबर १ केंद्रशाळा. शाळेचा १५४वा वर्धापन दिन शाळेत साजरा करण्यात आला. या निमित्याने विद्यार्थ्यानी शिक्षकाच्या भूमिका बजावत विद्यादानाचे काम केले. यावेळी केंद्रीय प्रमुख सहदेव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका दिव्या भाटकर, शिक्षिक उमेश दावरे, बाबासाहेब लाड, महेश शेडे, शिक्षिका स्नेहल यशवंतराव, मनोहर चव्हाण, सीमा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पूर्वा अभ्यंकर, सदस्या मैत्रेयी रेमणे, प्रवीण भोसले, वेदिका शिंदे, पद्मा कन्या शाळेचे मुख्याध्यापक संजय जाधव हे उपस्थित होते.
rat५p१६.jpg-राजापूर ः वर्धापन दिनाला उपस्थित अनादी शक्ती-तुरा समाज शाहीर संघ, राजापूर मंडळाचे पदाधिकारी आणि शाहिर.
शक्ती-तुरा समाज शाहीर संघाचा चौदावा वर्धापन दिन
राजापूरः अनादी शक्ती-तुरा समाज शाहीर संघ, राजापूर या मंडळाचा चौदावा वर्धापन दिन नुकताच हातिवले येथील दत्त मंदीरामध्ये संपन्न झाला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून जेष्ठ शाहिरांचे सत्कार,भेदीक शाहिरी, नूतन सभासद नोंदणी, सागरीत मांड आदी विविध कार्यक्रम पार पडले. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत वालम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमांच्यावेळी संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ उर्फ भाई गोसावी आणि कोल्हापूर येथील शाहीर बळवंत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाचे सचिव संतोष हातणकर, उपाध्यक्ष नारायण मिरगुले, विजय जोशी, दत्ताराम सौंदळकर, खजिनदार कृष्णा नागरेकर, आदिनाथ सांप्रदायिक अध्यक्ष मोहन कावळे, शाहीर सुकांत आयरे, दिनेश सोडये, अशोक खांडेकर, बापू धुमाळ, खेमाजी कुडाळकर, संतोष माळकर, अरुण वालम, दीपक बाईग, दत्ताराम गुरव, सहदेव नागरेकर, धुमाळ, बाईत, शिवगण, झोरे, डोंगरे, कणेरे आदी शाहीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.