डॉन्टस लॉ कॉलेजचे युवा महोत्सवात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉन्टस लॉ कॉलेजचे युवा महोत्सवात यश
डॉन्टस लॉ कॉलेजचे युवा महोत्सवात यश

डॉन्टस लॉ कॉलेजचे युवा महोत्सवात यश

sakal_logo
By

87074
कुडाळ ः गोंधळ लोकनृत्यातील स्पर्धकांना गौरविताना मान्यवर. (छायाचित्र ः अजय सावंत)


डॉन्टस लॉ कॉलेजचे युवा महोत्सवात यश

धीरज परब मंडळाचा पुढाकार; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुडाळात व्यासपीठ

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः धीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव २०२३ मध्ये येथील व्हिक्टर डॉन्ट्स लॉ कॉलेजने यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कलाकार लोकांसमोर यावा, या उद्देशाने हा उपक्रम महाविद्यालय स्तरावर राबविण्यात आला.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतून एकूण ७० स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. समूहनृत्य, एकल नृत्य, एकल गायन, स्कीट यामध्ये विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर केला. व्हिक्टर डॉटस लॉ कॉलेजच्या गोंधळ या पारंपरिक लोकनृत्याला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त झाले. यात महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विद्यार्थिनी हर्षाली पाताडे, तेजस्विनी पांगम, प्राची परब, रोझान खान, रश्मी साटम, सीताई राऊळ, लतिका वारंग, रुचिता कुमठेकर यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या ‘असाही एक बॅरिस्टर’, या बॅ. नाथ पै यांच्या जीवनपटावरील स्कीटला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. यात शुभम पाटील, अमेय जोशी, अर्जुन गावडे, पूजा पटेल, प्राची चिंदरकर, सहिष्णू पंडित, प्रथमेश सामंत, पूजा गोडकर, अपर्णा भिऊंगडे, मेघा परब, संदेश कोरगावकर, काजल पेडणेकर, अथर्व कुटे आदी सहभागी झाले. तर एकल गायनात अपर्णा भिऊंगडे, सुधा दामले, आद्या नागवेकर, सदानंद रानडे, एकल नृत्यात चेतना खानोलकर, कोतवडेकर यांनी सहभाग घेतला. प्रा. पूर्वा जोगळेकर, प्रा. श्रद्धा चिमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक व्हिक्टर डॉन्टस, प्रा. शिल्पा मर्गज यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.