राजापूर ः राजापूर गाळात जाऊ नये म्हणून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः राजापूर गाळात जाऊ नये म्हणून
राजापूर ः राजापूर गाळात जाऊ नये म्हणून

राजापूर ः राजापूर गाळात जाऊ नये म्हणून

sakal_logo
By

rat०५२.txt

बातमी क्र..२ ( टुडे पान १ साठी बिग स्टोरी)

rat५p२.jpg ः KOP२३L८७०४५ राजापूर ः विवेक गुरव

rat५p३.jpg ः KOP२३L८७०४६ संदीप मालपेकर

rat५p४.jpg ः KOP२३L८७०४७ प्रशांत भोसले

rat५p५.jpg ःKOP23L87110 खर्लीपात्रातील सुरू असलेला गाळ उपसा.

rat५p६.jpg ः KOP२३L८७०४९ गाळ उपशानंतर नदीपात्राची वाढलेली खोली आणि झालेला पाणीसाठा.

rat५p१७.jpg ः KOP२३L८७०७७ धरणातही गाळ साचल्याने तळवडे धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.

rat५p१८.jpg ःKOP२३L८७०७८ शहरालगतच्या नदीत


राजापूर गाळात जाऊ नये म्हणून

पूर प्रतिबंधक योजना ;अर्जुना-कोदवलीतील उपसा सुरू

इंट्रो

राजापूर शहराच्या विकासाला मारक ठरणारे ‘राजापूर आणि पूर’ हे गेल्या कित्येक वर्षापासूनच्या विक्षिप्त समीकरणाला कारणीभूत ठरत असलेला अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा सध्या सुरू आहे. नाम फाउंडेशनने महसूल विभाग, राजापूर नगर पालिकेच्या सहकार्यातून सुरू केलेल्या गाळ उपशाला लोकवर्गणीद्वारे लोकसहभागाचीही मिळत असलेली सकारात्मक साथ निश्‍चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल. गाळ उपशामुळे नदीपात्राची वाढलेली कमालीची डेप्थ भविष्यातील पुराची तीव्रता कमी होण्यास फायदेशीर ठरणार आहे. त्याचवेळी पूरस्थितीचे प्रमाण घटल्यास शहर विकासात अडथळा ठरणारी पूररेषा कमी होण्यासही मदत होईल. एकंदरीत, गाळ उपशाचे भविष्यामध्ये दिसणारे सकारात्मक परिणाम नाम फाउंडेशन आणि प्रशासनाच्या धडपडीला राजापूरकरांच्या एकीच्या वज्रमुठीचे निश्‍चितच फलित असणार आहे. मात्र, अद्यापही काम थांबलेले नाही. गाळ उपशाचे काम पुन्हा कधी होईल याबाबतची अनिश्‍चतता पाहता ‘अभी नही तो, कभी नही’ या उक्तीप्रमाणे आत्ताच गाळ उपशाचे काम मार्गी लावणे आणि आपल्या गावविकासासाठी समस्त राजापूरकरांनी आर्थिक साथ देण्याची अपेक्षा आहे.

राजेंद्र बाईत,राजापूर
......

राजापूरकरांची सामाजिक बांधिलकी अन् एकजूट कौतुकास्पद

गाळ उपशाची मोहीम हाती घेण्याचे निश्‍चित झाल्यानंतर निधी उभारणे आव्हानात्मक होते. मात्र, वारंवार पूरस्थिती आणि त्यातून रखडलेला गावविकास आदी समस्यांनी पिचलेल्या राजापूरकरांनी लोकवर्गणीतून निधी उभारण्याचे आव्हानही पेलले आहे. त्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाची मदत, सामाजिक मंडळे, प्रशासन यांच्यासह लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निधीचा समावेश आहे तर अनेकांनी गाळ वाहतुकीसाठी स्वखर्चाने मोफत डंपर उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. भविष्यामध्ये लोकवर्गणीचा ओघ कायम राहणार असून, कामाची पूर्ती होईपर्यंत तो ठेवणेही गरजेचे आहे. स्वतःच्या खिशामध्ये हात घालून आपल्या गावविकासासाठी राजापूकरांनी निधी संकलनासह कामावर देखरेख ठेवण्यासाठी केलेली एकजूट कौतुकास्पद म्हणावी लागेल.
.....................
नाम फाउंडेशनसह अधिकाऱ्‍यांची भूमिका कौतुकास्पद

नाम फाउंडेशनचे योगदान महत्वपूर्ण ठरलेले असून, राजापूरच्या भविष्यातील विकासासाठी निश्‍चितच दिशादर्शक ठरणारे आहे. त्यामध्ये नाम फाउंडेशनचे समीर जानवलकर, राजेश्‍वर देशपांडे आणि सहकार्‍यांनी लोकांशी सातत्याने संवाद साधत लोकसहभाग वाढवणे आणि एकजूट करण्यास प्रोत्साहित केले. प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव, नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी प्रशासकीय चाकोरीच्या बाहेर जाऊन गाळ उपशाच्या कामामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. दैनंदिन प्रशासकीय कामकाज करताना सामाजिक बांधिलकीतून लोकसंवाद साधत झोकून देत दिलेले योगदान राजापूरकरांच्या निश्‍चितच स्मरणात राहणार आहे. त्यामध्ये कामाच्या माध्यमातून लोकांमध्ये निर्माण केलेला सकारात्मक विश्‍वास, दांडगा जनसंपर्क आणि त्यांना त्यांच्या सहकार्‍यांनी दिलेली साथ उपयुक्त ठरली आहे.
.........................
पुन्हा नदीपात्रात गाळ संचयाची भिती
तत्कालीन आमदार गणपत कदम यांचे प्रयत्न आणि पुढाकारातून निधी उपलब्ध होऊन अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा यापूर्वी उपसा झाला होता. त्या वेळी १ लाख ९८ हजार क्युबिक गाळाचा उपसा होण्यासाठी शासनाकडून सुमारे ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यातून, २००९ मध्ये प्रत्यक्ष गाळ उपशाला सुरवात होऊन त्यानंतर दोन वर्ष हा गाळ उपसा टप्प्याटप्प्याने झाला. त्यामध्ये सुमारे १ लाख ७३ हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला होता. मात्र, त्या वेळी उपसलेला गाळ अन्यत्र न टाकता पिचिंग करून नदीपात्राशेजारी ठेवण्यात आला होता. पावसाळ्यामध्ये पिचिंग केलेला गाळ पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून येऊन पुन्हा एकदा त्याचा नदीपात्रामध्ये संचय झाला. या वेळीही मोठ्या प्रमाणात उपसा केलेला गाळ पिचिंग करून ठेवलेला दिसत आहे. त्याची पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातून अन्यत्र वाहतूक न झाल्यास ‘पुन्हा गाळ नदीपात्रात’ या पूर्वीच्या चुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

गाळ वाहतुकीसाठी निधीची अपेक्षा
शासनाकडून गाळ उपशासाठी निधी उपलब्ध होतो. मात्र, उपसा केलेल्या गाळाच्या वाहतुकीसाठी फारसा निधी दिला जात नाही. परिणामी, गाळ उपशाचे काम मार्गी लागते. मात्र, उपसलेल्या गाळाची नदीपात्रातून वाहतूक न होता तो तसाच पिचिंग करून ठेवला जातो. त्यामुळे गाळाच्या समस्येच्या समूळ उच्चाटनासाठी उपसा केलेल्या गाळाच्या वाहतुकीच्या खर्चाचा भार सामाजिक बांधिलकीतून लोकांना उचलावा लागत आहे.

दोन हजारहून अधिक डंपर वाहतूक

गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून गाळ उपशाचे काम सुरू आहे. त्यामध्ये पाटबंधारे विभाग, नाम फाउंडेशन यांसह चिरेखाण आणि ठेकेदार संघटना, व्यावसायिकांसह अन्य लोकांनी उपलब्ध करून दिलेल्या डंपरच्या साहाय्याने उपसा केलेल्या गाळाची वाहतूक केली जात आहे. त्यामध्ये दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सुमारे दोन हजारहून अधिक डंपर गाळाची वाहतूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सद्यःस्थितीमध्ये काही आंबा व्यावसायिक गाळ नेण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यातून उर्वरित उपसा झालेल्या गाळाची वाहतूक होणार आहे.

............

गाळ वाहतुकीचे नियोजनाचे आव्हान

जिल्हा नियोजन आणि लोकसहभागातून गोळा झालेला निधी आणि नाम फाउंडेशन अन् जलसंपदा विभागाकडून उपलब्ध झालेल्या मशिनरींच्या साहाय्याने गाळ उपशाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम आणखीन काही महिने सातत्याने सुरू राहणार आहे. मात्र, सद्यःस्थितीमध्ये उपसलेल्या गाळाची अन्यत्र वाहतूक करण्यासाठी डंपर उपलब्ध होत नसल्याने उपसलेला गाळ नदीपात्राशेजारी पिचिंग करून ठेवलेला दिसत आहे. हा गाळ अन्यत्र न हलवल्यास पावसाळ्यामध्ये पाण्यासोबत हा गाळ पुन्हा नदीपात्रात येणार आहे. असे झाल्यास गाळ उपसा करण्याचा मूळ उद्देश सफल होताना दिसणार नाही. सद्यःस्थितीमध्ये उपसा केलेल्या गाळाची उपलब्ध डंपरच्या साहाय्याने वाहतूक करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी निधी संकलन समिती आणि देखरेख समितीही सार्‍यांच्या साथीने प्रयत्नशील असली तरी भविष्यामध्ये गाळ वाहतुकीसाठी डंपर उपलब्ध करण्यासह मशिनरी आणि डंपर चालण्यासाठी इंधनखर्चासाठी लागणार्‍या निधीची उभारणी करण्याचे आव्हान आहे.
................

नदीपात्राची खोली वाढताना पाण्याचा साठा

अर्जुना असो वा कोदवली पावसाळ्यामध्ये पाण्याने दुथडी भरून वाहणार्‍या या नद्या उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी कोरड्या शुष्क दिसतात. गेल्या कित्येक वर्षापासूनचे हे चित्र कायम दिसत आहे. मात्र, गाळ उपशानंतर या चित्रामध्ये बदल होणाची सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. गाळ उपसा झाल्याने आयटीआयपासून खाली पुलापर्यंत आणि त्यानंतर संगमापासून वरती कोदवली नदीच्या पात्राची खोली वाढल्याचे दिसते. त्याचवेळी वर्षानुवर्षे उन्हाळ्यामध्ये कोरड्या असणार्‍या या नदीपात्रामध्ये पाण्याचा खळखळाट असल्याचे चित्र दिसत आहे.
................

अर्जुना नदीपात्रामध्ये मोठा पूल ते संगम आणि अर्जुना-कोदवली नद्यांचा संगम या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झालेला आहे. त्या गाळ उपशासाठी सुमारे २ कोटीहून अधिक निधीची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत हा उपसा करण्याचे नियोजन दिसत नसले तरी भविष्यामध्ये येथील उपशासाला आवश्यक असलेला निधी शासनाकडून मिळवण्यासाठी सार्‍यांनी एकत्रित लढा उभारणे आणि सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
.....
नदीपात्रातील गाळाची स्थिती

अर्जुना नदी ः मुंबई-गोवा हायवे पूल ते संगम ः १२८० मीटर ः ८८३३९.५ क्युबिक मीटर
कोदवली नदी ः आयटीआय ते संगम ः ११९० मीटर ः ७४२३७ क्युबिक मीटर
सायबाचे धरण ः सुमारे दीड कि.मी. ः सुमारे ६ लाख १७ हजार क्युबिक मीटर
.................

नदीपात्रातील गाळाची असलेली खोली

कोदवली नदी ः सुमारे १.५ ते २ मीटर
अर्जुना नदी ः सुमारे १ ते १.५ मीटर
.............
साचलेल्या गाळाचा प्रतिकूल परिणाम

अर्जुना-कोदवली नद्यांना वारंवार पूरस्थिती
शहर व परिसरातील गावांत दरववर्षी नुकसान
पूरस्थितीमुळे व्यापार्‍यांना दरवर्षी आर्थिक फटका
पूरस्थितीमुळे पूररेषा निश्‍चित
पूररेषेमुळे भरपाईपासून व्यापारी वंचित
गाळापरिणामीच्या समस्या शहराला मारक
.............
गाळ उपशाचा असा होईल फायदा

नदीपात्र खोल होऊन पाण्याचा साठा वाढणार
पूरस्थितीची सुमारे ७०-८० टक्के तीव्रता कमी
नद्यांच्या काठावरील विहिरींचे स्रोत वाढणार
शहरविकासात जाचक पूररेषा घटण्याची शक्यता
शहर विकासाला मिळणार चालना
धरणातील गाळ उपशामुळे पाणीसाठा होईल
एप्रिल-मे महिन्यातील पाणीटंचाई दूर होईल
..........

ऐतिहासिक राजापूर बंदर गाळात रूतलेले

इंग्रजांच्या काळामध्ये निर्यात केंद्र म्हणून राजापूर बंदर नावारूपास
या ठिकाणी मोठमोठी गलबते येत असत
येथून विविध प्रकारच्या वस्तू विविध भागांमध्ये निर्यात
गाळाने भरल्याने बंदरामध्ये येणारी गलबते बंद
काळाच्या ओघात राजापूर बंदर केवळ आठवण
......................
गाळ उपशासाठी राबत असलेली यंत्रसामुग्री

नाम फाउंडेशन ः ४ डंपर, १ पोकलेन
जलसंपदा विभाग ः ५ डंपर, १ पोकलेन
................
पाटबंधारे विभागाकडून सद्यःस्थितीमध्ये झालेला गाळ उपसा ः ४५ टीएमसी
...............

कोटला फोटो आहेत..

नदीपात्रातील गाळ उपशामुळे निश्‍चितच दरवर्षीची पूरस्थिती कमी होणार आहे; मात्र उपसा केलेल्या गाळाचा नदीपात्रामध्ये संचय करून ठेवण्याऐवजी त्याची नदीपात्राबाहेर वाहतूक करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने नियोजनाची आवश्यकता आहे. त्याचवेळी गाळ उपशासाठी निधीची उभारणी आणि कामावर देखरेख ठेवण्याला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला असला तरी उर्वरित कामासाठी अद्यापही निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी शहरवासियांसोबत तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांनीही सहकार्य करावे.
- विवेक गुरव, व्यावसायिक

...........

कोट
गाळ उपशासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. मात्र, हा निधी गाळ उपशासाठी खर्च होत असून वाहतुकीसाठी स्वनिधी उभारणे गरजेचे आहे. त्यातून गाळ उपसा होत असून गाळ वाहतुकीच्या खर्चासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यापूर्वी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल सार्‍यांना धन्यवाद. उर्वरित निधी उभारणीसाठी अशीच सार्‍यांनी सढळ हस्ते मदत करावी.
- संदीप मालपेकर, अध्यक्ष, राजापूर व्यापारी संघ
......

कोट
राजापूर शहराला सातत्याने भेडसावणार्‍या पूरस्थितीची समस्या सोडवण्यासाठी नदीपात्रातील गाळ उपसा सुरू आहे. त्याचवेळी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सायबाच्या धरणातील गाळ उपसा सुरू आहे. यासाठी नाम फाउंडेशनसह प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराला लोकांनी दिलेली साथ निश्‍चितच कौतुकास्पद आहे. गाळ उपशाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून उर्वरित गाळ उपशाच्या कामासाठी लोकांनी साथ द्यावी.
- प्रशांत भोसले, मुख्याधिकारी