देवगड विजेता तर कुडाळ उपविजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड विजेता तर कुडाळ उपविजेता
देवगड विजेता तर कुडाळ उपविजेता

देवगड विजेता तर कुडाळ उपविजेता

sakal_logo
By

87095
सिंधुदुर्गनगरी ः सर्वसाधारण विजेत्या देवगड तालुका संघाला सन्मानित करताना उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे. शेजारी विद्यार्थी व शिक्षक.

87096
सिंधुदुर्गनगरी ः सर्वसाधारण उपविजेता ठरलेला कुडाळ संघाचे विद्यार्थी व शिक्षक.


‘देवगड’ विजेता; ‘कुडाळ’ उपविजेता

मुलींच्या गटात वैभववाडी पुढे; सिंधुदुर्गनगरीतील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ४ ः सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्कोच्या मैदानावर १ ते ३ मार्च या कालावधीत झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत देवगड तालुक्याने सर्वसाधारण विजेतेपद तर कुडाळ तालुक्याने सर्वसाधारण उपविजेता पद मिळविले आहे. मुलांच्या गटात देवगड तालुका सर्वसाधारण विजेता ठरला असून मुलींच्या गटात वैभववाडी तालुका विजेता ठरला आहे. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे उपस्थित अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
निकाल असा ः मुली ११ ते १४ वयोगट-१०० मीटर धावणे : अंजली गोसावी (कणकवली नं १), रिया पालाडे ( जांभवडे नं १), सेजल भालेकर (धवडकी नं १). २०० मीटर धावणे : अक्षता गुरखे (नावळे धनगरवाडा), सेहा तेरसे (कडावल), समीक्षा खोत (कुणकेश्वर कातवण).
लांब उडी : लाजरी सुर्वे (माणगाव नं १), हर्षाली सावंत (सावडाव खलात्री), भार्गवी आळवे (झाराप). उंच उडी : सानिका परब (भालावल), प्राप्ती डिचोलकर (उभादांडा केपादेवी), सायना कदम (मोरगाव नंबर १), गोळा फेक - हेमांगी मेस्त्री (चराठे नंबर १), आर्या गावडे (हूमरमळा), साक्षी तावडे (तिथवली नं १), शंभर बाय चार मीटर धावणे विजेता कुणकेश्वर- मिठबाव, उपविजेता माणगाव. कबड्डी- विजेता उभादांडा मोचेमांड, उपविजेता सोनाळी नावाळे नापणे सांगुळवाडी. खोखो- विजेता लोरे हेळेवाडी उपविजेता मणचे फणसगाव. मुलगे ११ ते १४ वयोगट ः १०० मीटर धावणे-आदित्य गुरव (कसबा वाघोटन), रुद्र बागवे (आचरे पिरावाडी), राकेश हूगार (कणकवली नंबर १). २०० मीटर धावणे- यशराज जाधव (झाराप), गोविंद सावंत (असनिये), शांताराम हुले (परुळे कुशेवाडा). लांबउडी- गौरेश गवस (शिरंगे पुनर्वसन), कुणाल मांजरेकर (वालावल पूर्व), यश बांदिवडेकर (जानवली नंबर १). उंचउडी- गौरेश गवस (शिरंगे पुनर्वसन), चिन्मय खरूडे (मोरे वाडोस), सौरभ हिंदळेकर (हिंदळे नंबर १). गोळाफेक- रोहन गावडे (माणगाव नंबर १), अनुप शेटकर (सोनावल), रघुनाथ गावडे (न्हावेली नंबर १).
शंभर बाय चार मीटर धावणे रिले- विजेता असनिये विलवडे, उपविजेता घोणसरी नंबर ५. कबड्डी- विजेता साटेली भेडशी, उपविजेता केंद्र शाळा सुकळवाड नंबर १. खो-खो- विजेता पडेल, उपविजेता केंद्र शाळा नाधवडे. समूहगान- विजेता तेंडोली नंबर १, उपविजेता घोणसरी नंबर १. लहान गट आठ ते अकरा मुलगे ः ५० मीटर धावणे- अनय पास्टे (कुरंगवणे खैराट), भूमीश गोलतकर (तोंडवळी वरची), हर्षित नाईक (नंबर १). १०० मीटर धावणे- नारायण नाईक (शिरोडा केरवाडा), अनय पास्टे (कुरंगवणे खैराट), फ्रँकलिन फर्नांडिस (चिंदर कुंभारवाडी). लांबउडी- हर्षित नाईक (नंबर १), केतन थोटम (फणसे), युवराज धुरी (वाडोस). उंचउडी सिद्धार्थ फणसेकर (फणसे), अथर्व कदम (वेताळ बांबर्डे), वैभव कर्पे (घावनळे). पन्नास बाय चार मीटर धावणे- विजेता वेतोरे नंबर १, उपविजेता चराठे नंबर १. कबड्डी- विजेता वाडा पडेल, उपविजेता वजराट नंबर १ खो खो- विजेता पडेल, उपविजेता पाट वरचावाडा.
लहान गट आठ ते अकरा मुली ः ५० मीटर धावणे- पूर्वा गावडे (पिंगुळी), रिद्धी पाटेकर (कोकिसरे महालक्ष्मी), समीक्षा गावकर (कसवन नंबर २). १०० मीटर धावणे- फॅनी डिसोझा (रोजरी चर्च), निवेदिता मुणनकर (नेमळे नंबर ३), ज्ञानदा म्हालटकर (मांडखोल नंबर १). लांबउडी भूमी कदम (ओसरगाव नंबर १), दिया सावंत (आजगाव नंबर १), मान्यता पेडणेकर (वेंगुर्ले नंबर ३). उंचउडी- गार्गी बाईत (कुणकेश्वर नंबर १), दुर्वा मिठबावकर (सौंदाळे बाऊळ), रुचिका गावडे (वाडोस). पन्नास बाय चार मीटर धावणे रीले- विजेता माडखोल नंबर १, उपविजेता पडेल. कबड्डी- विजेता नापणे नंबर १, उपविजेता तरंदळे नंबर १. खो खो- विजेता लोरे नंबर १, उपविजेता मणचे फणसगाव.
----------
चौकट
विविध शाळांचे यश
८ ते ११ वयोगटातील मुले मुलगी गटात ज्ञानी मी होणार स्पर्धेत चिन्मय तोरसकर आणि आराध्या नाईक घोटगे वायांगणवड विजेते तर आराध्या सावंत आणि नीरजा परुळेकर हुमरमळा उपविजेता ठरले. समुहगांमध्ये शाळा तुळस वेताळ विजेते आणि माणगाव नं २ उपविजेता. समूह नृत्य स्पर्धेत शाळा वेंगुर्ला नंबर ४ विजेता आणि शाळा लोरे गुरववाडी उपविजेता. ११ ते १४ मुलगे मुली गटात ज्ञानी मी होणारमध्ये श्रेया मगर आणि यशश्री ताम्हणकर मसुरे नं १ विजेता तर तनिष्का राणे आणि यशश्री धुरी इन्सुली नं २ उपविजेता. समुहगानमध्ये शाळा तेंडोली नं १ विजेता तर शाळा घोणसरी नं १ उपविजेता. जिल्हा परिषद शाळा आडेली नं १ विजेता तर मारुती विद्यामंदिर जानवली उपविजेता ठरले.