रितीरिवाजानुसार मंगलाष्टके अन पाद प्रदक्षिणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रितीरिवाजानुसार मंगलाष्टके अन पाद प्रदक्षिणा
रितीरिवाजानुसार मंगलाष्टके अन पाद प्रदक्षिणा

रितीरिवाजानुसार मंगलाष्टके अन पाद प्रदक्षिणा

sakal_logo
By

KOP२३L८७०९९
rat५p२६.jpg -करजुवे - येथील पारंपरिक शिमगोत्सवात रविवारी दुपारी होम लावण्यात आला

रितीरिवाजानुसार मंगलाष्टके अन पाद प्रदक्षिणा

करजुवेतील होळी ; नवविवाहितांची खास उपस्थिती
संगमेश्वर,ता.५ ः तालुक्यातील करजुवे गावचा तेरसे शिमगोत्सवाला स्थानिक ग्रामस्थांसह पुणे , मुंबई चाकरमान्यांच्या उपस्थितीत शिमगोत्सव जल्लोषात पार पडला. रविवारी दुपारी १२:३० च्या दरम्यान होळीला होम लागला . होमापूर्वी समस्त करजुवेवासीय , मानकरी , गुरव , डावल आदी मानकर्‍यांच्या उपस्थितीत मध्य रात्रीहोळीचा माड उभा करण्यात आला.
रविवारी सकाळी श्री. देवी तळेकरणीच्या सहाणेवर बसलेल्या पालखीची पुजा अर्चा होऊन गुरव मानकऱ्यांच्या हस्ते झाडाखालील होळी देवाची पूजा होऊन मंगलाष्टके झाल्यानंतर सहाणेसमोरील रात्री उभ्या झालेल्या माडाखाली होली देवाला नेण्यात आले. तळेकरीण देवीच्या पुजा करणाऱ्या गुरवाकडून सवादय मिरवणुकीने आणल्यानंतर पुन्हा रितीरिवाजानुसार मंगलाष्टके होऊन होळीसाठी आलेल्या शेकडो भाविकांनी होमाच्या होळीची पाद प्रदक्षिणा व होळीरे होळी करत होम पेटविण्यात आला.
परंपरेनुसार होमामध्ये नारळ अर्पण करण्यात आले. मानकऱ्यांच्या पाठोपाठ समस्त नवदापंत्यांनी जोड्याने होमामध्ये नारळ अर्पण केले. होमात नारळ अर्पण करण्यासाठी नवविवाहित जोडपी आपल्या कुटुंबासह आली होती. होमात नारळ टाकण्याच्या या परंपरेला अत्यंत मोठा मान समजला जातो.
होमातील नारळ टाकण्याच्या परंपरेनंतर श्री देवी तळेकरीन देवीची पालखी सहाणेवरून उठली व समस्त मानकर्‍यांसह ढोल ताशे सनईच्या वादत्रीमध्ये माड व होमासह होळीच्या पेटत्या होमाला पालखी प्रदक्षीणा घातल्या नंतर माहेरवाशीणींसोबत आलेल्या चाकरमान्यांनी नवस केले व फेडले .